तर अभिनेत्री कंगना रानौतला होणार अटक वॉरंट जारी… जाणून घ्या प्रकरण

0 257

नवी मुंबई –  आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौतने (Actress Kangana Ranaut ) मागच्या काही दिवसापूर्वी गीतकार जावेद अख्तर यांच्यावर केलेल्या एका आरोपावरून परत एकदा कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

14 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत कंगनाच्या अनुपस्थितीबद्दल न्यायालयाने तिखट टिप्पणी केली आहे. टिप्पणी करताना न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, जर ती पुढील सुनावणीत कंगना रानौत न्यायालयात पोहोचली नाही तर तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले जाईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.

हे पण पहा –  Pimpri Chinchwad | दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार

गीतकार जावेद अख्तर यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. कंगना रनौत या प्रकरणाच्या सुनावणीला सतत अनुपस्थित राहिली आहे. यावेळीही कंगनाच्या वतीने तिचे वकील रिझवान सिद्दीकी न्यायालयात उपस्थित होते. त्याचवेळी, गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाची बदनामीची केस रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली.

Related Posts
1 of 96

सोमय्या यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा… अनिल परब यांनी दिला सोमय्यांना इशारा ..

कंगनाची बाजू मांडणारे तिचे वकील रिजवान यांनी कोर्टात कंगनाचा वैद्यकीय अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार, कंगनाला कोरोनाची लक्षणे सांगितली गेली आहेत. रिझवानने न्यायालयात युक्तिवाद केला की कंगना मागच्या 15 दिवसांपासून तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान खूप प्रवास करत आहे, त्या दरम्यान ती बर्‍याच लोकांना भेटत आहे. वकिलांनी न्यायालयाला 7 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे जेणेकरून या काळात कंगना चांगली होईल आणि तिची कोविड चाचणी होईल.  आता २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला अभिनेत्री कंगना रानौत न्यायालयात हजर होणार का नाही हे पाहावे लागेल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: