24 वर्षांनंतर अभिनेता सोहेल खान आणि सीमा खान घेणार घटस्फोट?

मुंबई – बॉलिवूडचा (Bollywood) दबंग सलमान खानचा (Salman Khan) लहान भाऊ अभिनेता सोहेल खान(Sohail Khan) आणि पत्नी सीमा खान (Seema Khan) यांच्यात लग्नाच्या 24 वर्षानंतर घटस्फोट (Divorce) होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज सोहेल खान आणि सीमा खान फॅमिली कोर्टाबाहेर दिसल्याने चर्चांनी जोर धरला आहे.
‘ईटाइम्स’च्या वृत्तानुसार, फॅमिली कोर्टातील एका सूत्राने सांगितले की, सोहेल खान आणि सीमा खान आज न्यायालयात हजर होते. दोघांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. त्यावेळी ते दोघेही मित्र असल्यासारखे दिसत होते. फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर दोघेही आपापल्या कारमधून घराकडे निघाले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोहेलच्या आयुबाजूला बॉडीगार्ड दिसत आहे. त्या दोघांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे.
सोहेल खान आणि सीमा खान 1998 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. 2017 मध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, सोहेल आणि सीमा वेगळे झाल्याची माहिती समोर आली होती.
‘द फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोमध्ये सोहेल आणि सीमा वेगळे राहतात आणि मुलं दोघांसोबत राहतात असं दाखवण्यात आलं होतं. सीमा आणि सोहेल वेगळे राहतात हे या शोमधून स्पष्ट झाले होते.