अभिनेता राजकुमार राव झाला ऑनलाईन फ्रॉडचा शिकार ; गुन्हा दाखल

प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई – बॉलीवूडचा (Bollywood) चर्चित अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) नेहमी आपल्या दमदार अभिनयामुळे सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असतो. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहताच्या मनात घर केला आहे. मात्र यावेळी तो एका वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याने तो चर्चेत आला आहे.
राजकुमार रावने त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं की, त्याच्यासोबत फ्रॉड (Fraud) झाला आहे. अभिनेत्याच्या पॅन कार्डवर कुणीतरी फसवणूक करून लोन घेतलं आहे. त्यानंतर राजकुमार रावने एका व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. राजकुमार रावने सांगितलं की, त्याच्या पॅन कार्डचा दुरूपयोग करून कुणीतरी त्याच्या नावावर लोन घेतलं आहे. ज्यामुळे त्याचा क्रेडिट स्कोर प्रभावित झाला आहे. आता याबाबत त्याने ट्विटरवर पोस्ट करून क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती घेण्यास सांगितले आहे.
राजकुमार रावने आपल्या ट्विटमध्ये सांगितलं की, त्याच्या पॅन कार्डचा दुरूपयोग केला गेला आहे. ‘माझ्या पॅन कार्डचा वापर करून माझ्या नावावर २५०० रूपयांचं एक छोटसं लोन घेण्यात आलं. ज्यामुळे माझा सिलिब स्कोर प्रभावित झाला आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेड कृपया हे बरोबर करा आणि या विरोधात कारवाई करा’.
तर अभिनेता राजकुमार राव ‘हिट’, ‘मोनिका’, ओ माय डार्लिंग आणि भीड सिनेमात दिसणार आहे. सध्या या सिनेमाच्या रिलीज डेट समोर आलेल्या नाहीत. पण आशा आहे की, हे सिनेमे यावर्षीच रिलीज होतील.