“या ” कारणाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे कुटुंबीय सोडणार भारत

0 25

नवी मुंबई –  बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Bollywood actor Nawazuddin Siddiqui) हा सोशल मीडियावर कोणत्याना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून राहतो. कधी आपल्या दमदार अभिनय मुळे तर कधी आपल्या खाजगी आयुष्यामुळे ते सोशल मीडियावर चर्चचा विषय असतो. अशीच एक चर्चा म्हणजे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यामध्ये सुरु असलेला वाद होय. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु आहे आणि ते वाद आता मिटले असून ते पुन्हा एकत्र आनंदाने राहत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मात्र तरीही नवाजच्या कुटुंबीयांनी भारत सोडून दुबईमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत स्वतः नवाजची पत्नी आलीय याने एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे . ती म्हणाली हो हे खरे आहे की आम्ही दुबईमध्ये शिफ्ट होत आहोत. दुबईमध्ये गेल्यावर आमची दोन्ही मुले शोरा आणि यानी तिकडेच शिक्षण घेणार आहेत असे आलिया म्हणाली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण “तो” संभाषण संजय राठोड यांचा?, पोलीस करणार तपास

पुढे दुबईत राहण्याचे कारण  सांगत आलिया म्हणाली, भारतात सध्या ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे आणि येत्या काही वर्षात हे असच राहणार असल्याचे आम्हाला दिसत आहे. त्यामुळे आम्ही मुलांना दुबईमधील शाळेत टाकले आहे. ऑनलाइन शिक्षण घेत असताना घरातील वातावरण ठिक नसते आणि मुले शिक्षणावर लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत. शाळेत जाऊन घेतलेले शिक्षण हे फार वेगळे असते. आम्ही लवकरात लवकर दुबई जाण्याचा प्रयत्न करत आहोत.
Related Posts
1 of 62
आलिया आणि मुलांना दुबईला सोडल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी लंडनला जाणार आहे. नवाज त्याचा आगामी चित्रपट ‘हिरोपंती २’च्या चित्रीकरणासाठी लंडनला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: