संघटीत गुन्हे करणारे कुख्यात गुन्हेगार व त्याचे टोळीतील सदस्यांविरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई

0 221

अहमदनगर –  अहमदनगर जिल्हयात संघटीत गुन्हे करणारे कुख्यात गुन्हेगार सुरेश रणजित निकम, (रा. कात्रड, ता. राहुरी, जि. अहमदनगर) आणि  त्याचे टोळीतील इतर ५ सदस्यांविरुध्द मोक्का कायदयान्वये (Mocca Act) कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील (Manoj Patil) यांनी अहमदनगर जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया आहेत त्यांचे विरुद्ध मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

त्या अनुशंगाने एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये २३ एप्रिल रोजी  गु.र.नं. २५४/२०२१ भा.दं.वि. क. ३९५,१२० (ब) प्रमाणे गुन्हा  घडला होता. या गुन्हाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा सुरेश रणजित निकम, (रा. कात्रड, ता. राहुरी, जि. अहमदनगर) (टोळी प्रमुख) व त्यांचे टोळीने संघटीतपणे केल्याची माहिती समोर आली होती . सदर टोळीविरुद्ध मोक्का कायद्याअन्वये कारवाई करणे करीता एमआयडीसी पोलीस स्टेशन जावक क्र. ५९/२०२१ दिनांक १३ जुलै २०२१ रोजी (मोक्का) प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचेकडे पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावास दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची मंजुरी मिळाल्याने  सुरेश रणजित निकम आणि इतर ५ सदस्यांविरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.

१) सुरेश रणजित निकम, (टोळीप्रमुख) २) करण नवनाथ शेलार, (टोळीसदस्य) ३) विकास बाळू हनवत, (टोळीसदस्य) ४) सागर शिवाजी जाधव, (टोळीसदस्य ) (५) सतिष अरुण बड़े (टोळीसदस्य) या आरोपींवर मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.

सदर टोळीविरुध्द खालील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत

१) एमआयडीसी पोस्टे अहमदनगर | २५४/२०२१ भा.द.वि. का. क ३९५ प्रमाणे

२) एमआयडीसी पोस्टे अहमदनगर १३२/२०२१ भा.द.वि.का.क ३९५ प्रमाणे

३) सोनई पालीस स्टेशन अहमदनगर । १३१/२०२१ भा.द.वि.का.क ३९४.३४ प्रमाणे

४) एमआयडीसी पोस्टे अहमदनगर 1.८६८/२०२० भा.द.वि. का.क ३९९, आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे (५) सोनई पोस्टे अहमदनगर ३११/२०२० भा.द.वि.क. ३९२,५०६,३४ प्रमाणे

Related Posts
1 of 1,481

६) एमआयडीसी पोस्टे अहमदनगर | ३९७/२०१९ भा.द.वि.का.क ३९२,३४९ प्रमाणे

(७) एमआयडीसी पोस्टे अहमदनगर. २१०/२०१५ भा.द.वि.का.क ३९५ प्रमाणे

८) एमआयडीसी पोस्टे अहमदनगर ।.११२/२०१५ भा.द.वि. का. क ३९५,४२७,३४ प्रमाणे

असे दाखल असलेले गुन्हे टोळीने संघटीतपणे केलेले आहेत. सदरचे गुन्हे हे अहमदनगर जिल्हयातील एमआयडीसी व सोनई पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे दरोड्याची तयारी करणे अशा स्वरुपाचे गुन्हे कट करुन व संगनमताने स्वतःचे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता दशहत निर्माण करुन केलेले आहेत. सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१)(11), ३(२) व ३(४) (मोक्का) अन्वये कारवाई मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची मंजुरी मिळाल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण विभाग जि. अहमदनगर हे करीत आहेत.

महाराष्ट्रासह देशातील ११ राज्यात डेंग्यूच्या नवीन व्हेरियंटचा धोका

वरील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारी टोळीविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. अशा प्रकारे अहमदनगर जिल्हातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे टोळीविरुध्द देखील आगामी काळात मोक्का कायदया अन्वये कारवाई करणार असल्याचे संकेत मा. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेले आहेत.

 हे पण पहा  – Ahmednagar breaking news | आयुर्वेद कॉनर जवळ बर्निंग कारचा थरार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: