संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळीतील पाच आरोपीविरोधात मोक्का कायदयान्वये कारवाई

0 226

अहमदनगर –    अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मागच्या काही दिवसापूर्वी अहमदनगर जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया आहेत त्यांचे विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्या अनुशंगाने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा संदिप ईश्वर भोसले (रा- बेलगाव, ता-कर्जत, जि. अहमदनगर) (टोळी प्रमुख) व त्यांचे टोळीने संघटीतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. सदर टोळीविरुध्द मोक्का कायद्याअन्वये कारवाई करणे करीता पारनेर पोलीस स्टेशनने दिनांक ०४ ऑगस्ट रोजी (मोक्का) प्रस्ताव  विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचेकडे पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावास दिनांक ०९ सप्टेंबर रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक  नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची मंजुरी मिळाल्याने सदरच्या टोळीतील टोळी प्रमुख व टोळीतील सदस्य यांच्यावर मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.

Related Posts
1 of 1,608
मिलन उर्फ मिलिंद ईश्वर भोसले (वय १९ वर्ष, रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) , संदिप ईश्वर भोसले (रा- बेलगाव, ता-कर्जत, जि. अहमदनगर (टोळी प्रमुख), मटक्या उर्फ नारायण ईश्वर भोसले (रा- बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर), जमाल उर्फ पल्या ईश्वर भोसले (रा-बेलगाव, ता. कर्जत, जि- अहमदनगर), अटल्या उर्फ अतुल उर्फ योगेश ईश्वर भोसले (रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) या आरोपींवर  मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदर टोळीविरुध्द खालील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

१) नगर तालुका पोलीस १३२/ २०२० भा.द.वि. कलम ३९९,४०२ प्रमाणे.

२) नगर तालुका पोलीस ११६ / २०२० भा.द.वि. कलम ३९५,३९४, ३४२, ४२७, ३४ प्रमाणे.
३) नगर तालुका पोलीस ७५/२०२१ भा.द.वि. कलम ४५४,३८०, ४११,३४ प्रमाणे.
४) नगर तालुका पोलीस ८७ / २०२१ भा.द.वि. कलम ४५४, ३८०, ४११,३४ प्रमाणे.
५) कर्जत पोलीस स्टेशन, ६४/२०१६ भा.द.वि. कलम ३९९४०२ प्रमाणे.
६) कर्जत पोलीस स्टेशन ४३ / २०१७ भा.द.वि. कलम ३९५,३९७, ३४२ प्रमाणे.
७) कर्जत पोलीस स्टेशन, ४५३ / २०२० भा.द.वि. कलम ३९५,३९७, ४५७, ३८० प्रमाणे
८) कर्जत पोलीस स्टेशन, ७३१/ २०२० भा.द.वि. कलम ३०६, ३४ प्रमाणे.
९) पारनेर पोलीस स्टेशन ०९/ २०२१ भा.द.वि. कलम ४५७, ३९२, ४११,५०६, ३४ प्रमाणे.
१०) पारनेर पोलीस स्टेशन, १०८/ २०२१ भा.द.वि. कलम ४५४, ३८०, ४११, ३४ प्रमाणे.
 पाथर्डी पोलीस स्टेशन, T७४/ २०१८ भा.द.वि. कलम ३९९,४०२ सह आर्म अॅक्ट कलम ४/२५ १४) एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन ९५ / २०२१ भा.द.वि. कलम ४५४,४५९,३८०, ३४ प्रमाणे
११) पाथर्डी पोलीस स्टेशन, ४९ / २०१८ भा.द.वि. कलम ३९६,२०१ प्रमाणे.
१2) जामखेड पोलीस स्टेशन, T३५/२०१६ भा.द.वि. कलम ३९४, ४५८, ४५९ प्रमाणे.
असे दाखल असलेले गुन्हे टोळीने संघटीतपणे केलेले आहेत. सदरचे गुन्हे हे अहमदनगर जिल्हयातील पारनेर, नगर तालुका, एमआयडीसी, कर्जत, पाथर्डी, जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, दरोडयाची तयारी करणे, जबरी चोरी करणे, खुनासह दारोडा टाकणे, घातक शस्त्राचा वापर करुन दुखापत करुन दरोडा टाकणे अशा स्वरुपाचे गुन्हे कट करुन व संगणमताने स्वतःचे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता दशहत निर्माण करुन केलेले आहेत. सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१)(।।), ३(२) व ३(४) (मोक्का) अन्वये कारवाई मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची मंजुरी मिळाल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण विभाग जि. अहमदनगर हे करीत आहेत.
वरील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारी टोळीविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. अशा प्रकारे अहमदनगर जिल्हातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे टोळीविरुध्द देखील आगामी काळात मोक्का कायदया अन्वये कारवाई करणार असल्याचे संकेत मा. पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील साहेब, यांनी दिलेले आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: