नगर पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन 03 आरोपी विरुध्द कारवाई

अहमदनगर : पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, पोलीस अमलदार विजयकुमार वेठेकर,संदीप घोडके, शंकर चौधरी,राहुल सोळंके,लक्ष्मण खोकले,रणजीत जाधव व अर्जुन बडे यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने
पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीमध्ये मंगळवार व बुधवार रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून ०३ ठिकाणी छापे टाकुन एकुण १,४६,०००- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे २,६०० लि. कच्चे रसायन, १६० लि. गावठी हातभट्टीची दारू जप्त करुन खालील प्रमाणे ०३ आरोपीं विरुध्द नगर तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण ३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
आरोपीचे नांव
१) बाळासाहेब दत्तात्रय काळे रा. बाबुर्डी
२) कानिफ भिमाजी कळमकर रा. नेप्ती
३) गणेश टिलु पवार रा. नेप्ती,
कच्चे रसायन सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील साहेब,नगर ग्रामिण विभाग अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे