व्हायरल व्हिडिओतील त्या व्यक्तीवर कारवाई करुन पारधीसमाजाची बदनामी थांबवावी- आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेची मागणी

0 10
  श्रीगोंदा ;-  गेल्या काही दिवासांपासून एक पती त्याच्या पत्नीला चारित्र्याचा संशय घेऊन तिचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलामधून पाच रुपयाचे नाणे काढण्याची सक्ती केल्याचा अमानुष प्रकार समोर आला आहे. सदरील प्रकार हा पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिक असून सदरील व्यक्तीचा आणि त्या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतानाच सदरील घटना एका जातीशी जोडली जावून विनाकारण अवास्तव घटनांना अतिरंजित करून सांगितले जात आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडिओतील त्या व्यक्तीवर कारवाई करुन पारधी समाजाची बदनामी थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे राज्य समन्वयक प्रमोद काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अरे देवा! आरोग्य विभागाच्या परीक्षेआधीच गोंधळ

सदरील घटनेचा आणि स्थानिक जातपंचायतीचा काहीही संबंध नसताना सदरील प्रकार हा जात पंचायातीतून झाला आहे हा प्रचार साफ खोटा व चुकीचा आहे. अशा जात पंचायती सध्या क्वचितच अस्तित्वात असून त्याही बरखास्त करण्यासाठी व समाजाचे प्रबोधन करून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही तळागाळातील व्यक्तींसोबत काम करून परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अशातच या व्हायरल व्हिडिओमुळे पती-पत्नी यांच्यातील अविश्वासातून घडलेल्या प्रकाराला पारधी समाजाशी जोडले जात असल्यामुळे समाजातील इतर घटकांचा पारधी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होत आहे. त्यामुळे या व अशा प्रवृत्तींना आळा बसण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलावीत.

Related Posts
1 of 1,290

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी 

तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी पारधी समाजाची बदनामी थांबवावी व आदिवासी पारधी समाजाच्या इतर गंभीर समस्यांवर कधी तरी आवाज उठवण्याची तसदी घ्यावी अशी प्रतिक्रिया यावेळी आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे राज्य समन्वयक प्रमोद काळे यांनी दिली.पुरोगामी महाराष्ट्रात आजही अशा घटना घडणे हे पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा कीती घट्ट आहे हे सदरील घटनेवरुन दिसत असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्या मिरा शिंदे यांनी व्यक्त केली.यावेळी आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे राज्य समन्वयक प्रमोद काळे, अविनाश घोडके, तालुकाध्यक्ष दिगंबर काळे, तालुका उपाध्यक्ष विजय भोसले, सागर काळे, इश्वर काळे, उमेश काळे, मांढरे काळे उपस्थित होते.

पेट्रोलच्या वाढत्या दराबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले….

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: