अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई; 10 लाखाचा मुद्देमाल जप्त

0 236
Action on vehicle transporting illegal sand; 10 lakh worth of property confiscated
 श्रीरामपूर – Dysp संदीप मिटके (Sandeep Mitke)यांच्या पथकाने श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई करत 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अनिल सोपान शेलार आणि फारुख ख्वाजा शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. (Action on vehicle transporting illegal sand; 10 lakh worth of property confiscated)
Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत 27 एप्रिल रोजी श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून (Godavari river) चोरून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून मिटके यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
Related Posts
1 of 2,427
या आदेशानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी  चोरटी वाळू वाहतूक करताना वरील आरोपी मिळून आल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 10 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच  आरोपी विरुध्द PC  नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे भा द वि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवाई मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके,  पो. नि. मच्छिंद्र खाडे, HC भारत जाधव, PC नितीन शिरसाठ,  चांद पठाण, सुनील दिघे आदींनी केली. (Action on vehicle transporting illegal sand; 10 lakh worth of property confiscated)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: