DNA मराठी

दूध भेसळीवर कारवाई सूत्रधारापर्यंत पोहचण्याचे आव्हान

दुधात भेसळ पकडली गेल्यावर सुरवातीला बाळासाहेब पाचपुते व संदीप मखरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता

0 39
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी या ठिकाणी वांगदरी रोडवर दूध भेसळीवर कारवाई झाल्यावर पोलिसांनी विषय गांभीर्याने घेत रोजच आरोपीच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आतापर्यंत १२ जनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये ७ जण जेरबंद ५ फरार  तर ६ जण अजूनही संशयित असल्याने भेसळीच्या दुधाची किती व्याप्ती वाढणार आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.
                                      श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी येथील वांगदरी रोडवर दुधात भेसळ पकडली गेल्यावर सुरवातीला बाळासाहेब पाचपुते व संदीप मखरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर तपासात अनेक नावे समोर आली पोलिसांनी मखरेवाडी येथील संदीप मखरे याच ताब्यात घेतले त्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली अनेक नावे वाढत गेली मुख्य आरोपी  बाळासाहेब बाबुराव पाचपुते रा वांगदरी रोड काष्ठी (फरार) झाल्यापासून पोलिसांनी आतापर्यंत  संदिप संभाजी मखरे, वय ३८ वर्षे रा मखरेवाडी, वैभव रामदास राऊत, वय २५ वर्षे बोरूडेवाडी श्रीगोंदा, दिपक विठठल मखरे, वय. ३२ वर्षे रा मखरेवाडी श्रीगोंदा निलेश तुकाराम मखरे, वय. ३२ वर्षे रा मखरेवाडी,संदीप बबन राऊत, वय. ३६ वर्षे रा बोरूडेवाडी श्रीगोंदा यांच्यासह  कैलास बाबाजी लाळगे, वय २२ वर्षे, रा. शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे,वैभव जयप्रकाश हांडे, वय ३८, रा. उमरज न २, ता.जुन्नर, जि. पुणे यांना जेरबंद केले असून सतीष उर्फ आबा कन्हेरकर, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा (फरार) महेश मखरे, रा. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा (फरार)शुभम बोडखे, रा. श्रीगोदा, ता. श्रीगोंदा (फरार) समिर शेख, रा. राहुरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर (फरार) आहेत संदीप मखरे याची आलिशान चारचाकी तसेच टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईचा बडगा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात उगारला असून आतापर्यंत  दुधभेसळ प्रकरणात आतापर्यंत १२ जनावर गुन्हा दाखल ७ जण जेरबंद ५ फरार  तर ६ जण अजूनही संशयित श्रीगोंदा पोलिसांनी ६ ताब्यात घेतले आहेत त्यामुळे आतापर्यंत शिरूर पुणे जुन्नर यासह अक्कलकोट राहुरी अश्या अनेक ठिकाणी दूधभेसळीची पाळेमुळे रोवली गेली होती हे सिद्ध झाले आहे त्यामुळे या प्रकरणात लवकरच श्रीगोंदा पोलिसांच्या हाती मोठे मासे लागणार आहेत अशी खात्री श्रीगोंदा पोलिसांनी व्यक्त केली आहे

सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढ, राजकारणात डागाळलेली नेते, तरीही मी तो नव्हेच.

लक्ष्मी मारतेयं चकरा ?
श्रीगोंदा तालुक्यातील संशयित ताब्यात घेतल्यावर आपले नाव यातून बाहेर कसे काढता येईल त्यासाठी लाखोंची लक्ष्मी पिशवीतून पोलीस ठाण्याच्या परिसरात चकरा मारताना दिसत होती मात्र त्यास पोलिसांनी कोणत्याही प्रकारची दाद दिली नसल्यामुळे लक्ष्मी हिरमुसून परत घरी पोहोचली
संभाजी ब्रिगेडचे आंदोलन !
दूध भेसळ करणाऱ्या लोकांच्या विरोधात सरकारने कडक पाऊले उचलावीत यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने धडक मोर्चा व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी अनेक वक्त्यांनी दूधभेसळ करणाऱ्या लोकांच्या विषयी मोठा संताप व्यक्त होताना दिसत होता
सूत्रधारापर्यंत पोहचण्याचे आव्हान

श्रीगोंदा तालुक्यातील दूध भेसळ रॅकेटमध्ये अनेक मोठ्या धेंडांचा हात असल्याची चर्चा आहे. यामुळे या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचे पोलीसांपुढे खरे आव्हान असणार आहे. पोलिसांनी सुरू केलेला तपास योग्य दिशेने व्हावा यातील बडे माश्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सामान्य जनता करत आहे.

Related Posts
1 of 2,510
पोलिसांना जनतेमधून मोठा प्रतिसाद 
दूध भेसळ प्रकरणात अनेक जण जेरबंद केल्यावर पोलिसांच्या या कामगिरी बाबत जनतेमधून मोठा चांगला प्रतिसाद दिला जात आहे मात्र दूधभेसळ करणाऱ्या विषयी लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात तिरस्कार पाहण्यास मिळत आहे
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: