जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई

0 13
अहमदनगर –  मागच्या काही दिवसांनी राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे राज्यातील नागरिकांची संवाद साधला या संवादात त्यांनी राज्यात होत असलेले राजकीय ,धार्मिक ,सामाजिक कार्यक्रमास बंदी आणली.

मात्र तरीही नागरिकांकडून सार्वजनिक कार्यक्रमात ,लग्नसमारंभात नियमाचे मोठ्याप्रमाणात उल्लंघन होत आहे. नागरिकांकडून होणाऱ्या नियमाचे उल्लंघन रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः कोरोना रोखण्यासाठी मैदानात उतरून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

अहमदनगर शहरातील तीन मंगल कार्यालयांना भेट देत विना मास्क आढळलेल्या १३० जणांवर कारवाई  करत याचा दंड संबंधित मंगल कार्यालयाच्या मालकाकडून घेण्यात असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली.

लॉकडाउनचा अल्टिमेटम दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

मागच्या काही दिवसापूर्वी जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने पोलिस विभागाकडून मास्क न लावणाऱ्या विरुद्ध कुठलीही कारवाई केली जात नव्हती. मात्र आता जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश काढून नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. नियमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतः जिल्हाधिकारी ,पोलिस अधीक्षक मैदानात उतरले आहेत मास्क न लावणाऱ्यावर १०० रुपयांचा दंड ठोठावला जात आहे.

Related Posts
1 of 1,290

पंतप्रधानांच्या नावाने फसवणूक करून शेकडो नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला अटक 

सोमवार दि. २२ फेब्रुवारी रोजी कारवाईसाठी जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी देखील कारवाई मध्ये सहभागी झाले होते . जिल्हा पोलीस दलाने जिल्हाधिकारी यांच्या नवीन आदेशानुसार जिल्ह्यात वीना मास्क फिरणार्‍या विरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण – संजय राठोड

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: