विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू विक्रेत्या विरुध्द जिल्ह्यामध्ये कारवाई

0 539

अहमदनगर –  अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,सौरभकुमार अग्रवाल ,अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि  अनिल कटके व त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटखा, पानमसाला व मावा विक्रेत्या विरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये कारवाईची विशेष मोहीम राबवून दि. २१ ऑगस्ट २०२१ ते दि. २६ ऑगस्ट २०२१ चे दरम्याण आठ  ठिकाणी छापे टाकून एकूण १० लाख ९ हजार ८७० रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये वेगवेगळ्या कंपणीचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, कच्ची सुपारी, तयार मावा, चूना, मावा तयार करण्याचे इलेक्ट्रिक मशिन जप्त करुन खालील प्रमाणे ११ आरोपी विरुध्द कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी व शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय संहिता १८६० चे कलम ३२८, १८८, २७२, २७३ नुसार खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

१) कोतवाली पो.स्टे. गुरनं. ६१३/२०२१

जप्त मुद्देमाल :- ५,४००/-रु. किं. ची प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू, सुपारी, मावा

आरोपीचे नांव :- समीर मेहमूद सय्यद, वय ३५ वर्षे, रा. नेप्ती, ता. नगर

२) तोफखाना पो.स्टे. गुरनं. ७११/२०२१

जप्त मुद्देमाल :- १६,७००/- रु. किं. ची प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू, सुपारी, मावा

आरोपीचे नांव :- विजय विष्णू सब्बन, वय – ३० वर्षे, रा. दातरंगे मळा, अहमदनगर

३) तोफखाना पो.स्टे. गुरनं. ७२१ / २०२१

जप्त मुद्देमाल :- १,१६,४१८/- रु. किं. ची प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू, पानमसाला

आरोपीचे नांव :- राजू नारायण सब्बन, रा. बागडपट्टी, तोफखाना, अहमदनगर

४) कोतवाली पो.स्टे. गुरनं. ६१६/२०२९

जप्त मुद्देमाल :- १८,७०० रु. किं. ची प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू, सुपारी, मावा

Related Posts
1 of 1,608

आरोपीचे नांव : रियाज रहीमबक्श तांबोळे, वय ५३ वर्षे, रा. पारशाखूंट, अहमदनगर

५) एमआयडीसी पो.स्टे. गुरनं. १५६७ / २०२१

जप्त मुद्देमाल :- ३,१७, ८००/-रु. किं. ची प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू, सुपारी, मावा

आरोपीचे नांव राजू शामराव वराट, वय ३५ वर्षे, रा. निंबळक, ता. नगर

राज्यात पुन्हा लागणार संचारबंदी….?, केद्रानं दिल्यात स्पष्ट सूचना

६) तोफखाना पो.स्टे. गुरनं. ७३३ / २०२९

जप्त मुद्देमाल :- ६२,४५२/- रु. किं. ची प्रतिबंधीत वेगवेगळ्या कं. चा पानमसाला व सुगंधी तंबाखू आरोपीचे नांव :- अमोल नानासाहेब काळे, रा. रेणूकानगर, बोल्हेगांव, अ.नगर
७) शेवगाव पो.स्टे. गुरनं. ५०५/२०२१

जप्त मुद्देमाल :- १६,९००/-रु. किं. ची प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू व मावा आरोपीचे नांव :- १) राजेन्द्र पंढरीनाथ शिंदे, वय – ३७ वर्षे, रा. घारतळे गल्ली, बोधेगाव, ता. शेवगाव, २) लतीफ बाबा शेख, वय- ४५ वर्षे, रा. भराट गल्ली, बोधेगाव, ता. शेवगाव, ३) रम्मू बाबा शेख, वय – ३९ वर्षे, रा. सदर, ४) जमीर रशीद शेख, वय – ३८ वर्षे, रा. मंगल कार्यालयासमोर, बोधेगाव, ता. शेवगाव

८) कोतवाली पो.स्टे. गुरनं. ६२३ / २०२१)

जप्त मुद्देमाल :- ४,५५,५००/-रु. किं. ची प्रतिबंधीत वेगवेगळ्या कंपणीची सुगंधी तंबाखू, कच्ची सुपारी, मावा, चूना, मावा तयार करण्याचे इलेक्ट्रिक मशिन व प्लॅस्टिक पिशव्या आरोपीचे नांव :- रमजान मन्सूर पठाण, वय ३० वर्षे, रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अ.नगर

हे पण पहा – बायोडिझेल तस्करी चालकाला मारहाण दहशद निर्माण करण्यासाठी बनवला व्हिडीओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: