खुनाच्या गुन्ह्यात ८ वर्षापासुन फरार असलेल्या ‘त्या’ आरोपीला अटक

अहमदनगर – मागच्या २२ वर्षांपूर्वीच्या खुनाच्या प्रकरणात जन्मठेपची शिक्षा लागलेला आणि ८ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे. सुधाकर ढाकणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शेतातील पाणी वाटपावरून शेवगाव तालुक्यातील सुर्यभान मोहन ढाकणे आणि सुधाकर पुंजाराम ढाकणे यांच्यात किरकोळ वाद होता. याच वादावरून २१ डिसेंबर १९९८ रोजी सुधाकर ढाकणे याने सुर्यभान ढाकणे यास चाकुने मारहाण करून जबर जखमी केले होते. जखमी सुर्यभान मोहन ढाकणे यांना जबर मारहाण झाल्याने त्यांना सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर येथे औषधोपचारा कामी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर घटनेबाबत सुर्यभान ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासात आरोपी नामे सुधाकर पुंजाराम ढाकणे यास तात्काळ अटक करण्यात आली होती आणि आरोपी विरुध्द सबळ पुरावा गोळा करून मुदतीत मा . न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते .
सदर प्रकरणाची न्यायालयात नियमित सुनावणी होवुन मा . जिल्हा व सत्र न्यायालय , अहमदनगर यांनी आरोपी सुधाकर पुंजाराम ढाकणे यास केसच्या सुनावणी अंती जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती . सदर शिक्षेविरुद्ध आरोपीने मा . उच्च न्यायालय , औरंगाबाद येथे आपील दाखल केले होते . मा . उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दिनांक २८ जुलै २०१४ रोजी आपीलाची सुनावणी होवुन मा . उच्च न्यायालयाने ही आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम केली होती . तेव्हा पासुन सदर आरोपी फरार झालेला होता . सदर फरार आरोपीचा शोध घेवून कारवाई करणे बाबत मा . उच्च न्यायालयाने आदेश दिले होते . नमुद आदेश प्राप्त होता अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन कारवाई करणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले.
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे , सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ ,पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे , फकीर शेख , देवेंद्र शेलार , पोलीस नाईक शंकर चौधरी, पोलीस नाईक सुरेश माळी ,पोलीस नाईक संदिप दरंदले ,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे ,पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे , पोलीस कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे अशांनी मिळुन आरोपीचा शोध घेत असतांना गुन्हयातील फिर्यादी , साक्षीदार यांचेशी संपर्क केला व आरोपीचे वास्तव्या व कामकाजा बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला .
आरोपी पुणे किंवा मुंबई येथे राहत असुन तो वारंवार वास्तव्याचे ठिकाणे बदलुन राहतो अशी माहिती मिळाल्याने त्याचा पुणे , वाशी भाजीपाला मार्केट व नवी मुंबई येथे जावुन शोध घेतला याचवेळी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपी सुधाकर पुंजाराम ढाकणे हा त्याचे राहते घरी शेवगाव येथे अक्षय तृतीयाचे दिवशी वडीलांचे पित्र जेवू घालणे करीता आलेला आहे . परंतु तो घरात थांबत नसुन आडरानात किंवा शेतात झाडाखाली आपले अस्तित्व लपवुन राहत असुन अक्षय तृतीयेचा कार्यक्रम होताच पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी आरोपी राहते घराचे आजुबाजुला तसेच शेतामध्ये सापळा लावुन त्यास शिताफिने ताब्यात घेत शेवगाव पोलीस स्टेशन हजर करण्यात आले असून पुढील कारवाई शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहेत .