12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक

0 300

अहमदनगर –   मागील १२ वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले  आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखे (Ahmednagar Local Crime Branch) ने कारवाई करत अटक (Arrested ) केली आहे. या कारवाईत अशोक सदाशिव वनवे  या आरोपीला अटक करण्यात आली आहे  . हा आरोपी मागच्या १२ वर्षांपासून फरार होता.

या प्रकारातन मिळालेली अधिक माहिती अशी कि २००९ मध्ये आरोपी अशोक सदाशिव वनवे, (रा. केडगाव, अहमदनगर) व त्याचे साथीदारांविरुध्द कोलवाली पो.स्टे. येथे भादवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपीस अटक करुन अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आलेला होता. नमुद आरोपी हा सन २००९ मध्ये न्यायालयातून जामिनावर मुक्त झाल्यापासून फरार झालेला होता. सदर आरोपीस सेशन केस नं. २४८/२००९ मध्ये हजर करणे कामी मा. जिल्हा सत्र न्यायालय, अहमदनगर यांनी आरोपी विरुध्द अटक वॉरंट जारी केलेले होते. परंतु आरोपी मिळून येत नव्हता.

त्यानंतर मा. जिल्हा सत्र न्यायालय, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर येथील स्पेशल सेल मार्फत वॉरंटची बजावणी करणे बाबत आदेश केल्याने अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/ दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, संदीप पवार, संदीप घोडके, पोकॉ/योगेश सातपूते यांचे स्वतंत्र पथक नेमून आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करुन न्यायालयात हजर करण्याबाबत सूचना दिल्या.

त्या सुचना प्रमाणे पथकातील पो. अंमलदार हे आरोपीचा शोध घेत होते. परंतू आरोपीने वास्तव्याचे ठिकाण बदलल्याने आरोपी बाबत काही एक माहिती प्राप्त होत नव्हती. पथकातील अंमलदार हे बातमीदार मार्फत आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेवून आरोपीचा शोध घेत असताना पोनि / अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली कि आरोपी अशोक वनवे हा कांदा मार्केट, केडगांव, अहमदनगर येथे येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अंमलदार यांनी कांदा मार्केट येथे जावून आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे अशोक सदाशिव वनवे, रा. दत्त मंदीराजवळ, केडगांव गावठण, अहमदनगर यांस ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी कोतवाली पो.स्टे. ला हजर केले आहे. पुढील कार्यवाही कोतवाली पो.स्टे. करीत आहेत.

Related Posts
1 of 1,603

नगरपरिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक बेकायदेशीर :- भारत घोडके

सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभकुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार केलेली आहे.

हे पण पहा –Viral Video: 150 किलोची पल्सर डोक्यावर घेऊन हे महाशय थेट बसच्या टपावर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: