चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक, 11 लाख 75 हजार रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त

0 246

श्रीगोंदा   :-  दि .27 आगस्ट रोजी फिर्यादी  अमोल माणीक पाचपुते रा.काष्टी ता.श्रीगोंदा यांच्या फिर्यादी दिली की , दि .27 आगस्ट रोजी दुपारी 02च्या सुमारास बारामती सहकारी बँक शाखा काष्टी येथे हॉटेल जयश्री परमीट रुमचा भरणा करण्यासाठी रोख रक्कम 1 लाख 60 हजार रुपये व तसेच फिर्यादी यांचा भाऊ राजेंद्र पाचपुते यांनी आर.के.कलेक्शन चे कपड्याचे दुकानाचे खरेदीसाठी ठेवलेले हॉटेल जयश्री चे काऊंटरमधुन चोरीस गेलेले रोख रक्कम 10 लाख असे एकुण 11 लाख 60 हजार रु.रोख रक्कम आरोपी नामे थोरात नाव गाव माहीत नाही याने लबाडीचे ईराध्याने स्वताचे फायद्याकरीता चोरुन नेली आहे . वैगेरे मजकुर चे फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 584/2021 भा.द.वि 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्याचा तपास पोना संतोष फलके हे करीत होते.

दि .02 सप्टेंबर रोजी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली व तांत्रिक विश्लेषणावरुन सदर गुन्हा हा आरोपी रोहीदास सोमा थोरात रा.माळीनगर ता.श्रीगोंदा हल्ली राहणार.उस्मानाबाद ता.जि.उस्मानाबाद याने केला असल्याची खात्री झालेवरुन त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर व कर्मचारी यांना सदर बाबत सुचना देवुन रवाना केले त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपी नामे रोहीदास सोमा थोरात रा.माळीनगर ता.श्रीगोंदा ह.रा.उस्मानाबाद ता.जि.उस्मानाबाद याला उस्मानाबाद येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यातील चोरीस गेलेली रोख रक्कम 11 लाख 50 हजार रुपये व 25,हजार रुपये किं.ची गुन्ह्यात वापरलेली एक काळे रंगाची बजाज डिस्कव्हर मोटर सायकल एम.एच .16 ए.पी .1725 अशी एकुण 11 लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे .

अहमदनगरसह “या” जिल्ह्यांनी सतर्क राहावे , आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

Related Posts
1 of 1,487

सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले , सपोनि दिलीप तेजनकर , सफौ.अंकुश ढवळे , पोना संतोष फलके , पोकॉ प्रकाश मांडगे ,पोकॉ किरण बोराडे , पोकॉ अमोल कोतकर यांनी केली आहे .

हे पण पहा – भरपावसात निलेश लंके यांची तुफान फटकेबाजी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: