चाकूचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या आरोपीला अटक, परराज्यात जाऊन पोलिसांची कारवाई

0 181

पुणे –  महिलेला काम देण्याच्या बहाण्याने त्याच्या डोक्याला दगड मारून आणि तिला चाकूचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या आरोपीला कोंडवा पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत कोंडवा पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला कर्नाटकमधून अटक केली आहे.

श्रीनिवास गणेश जाधव (३०, रा. थेरगाव, जगतापनगर, पिंपरी. मूळ रा. रायचूर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणातबाबत ४५ वर्षीय मजूर महिलेने फिर्याद दिली होती. ही घटना १ सप्टेंबर रोजी घडली होती. तक्रारदार महिला कोंडवा येथे वास्तव्यास असून बिगारी काम करते. जाधव याने महिलेला कोंढवा खुर्द येथून कानिफनाथ डोंगराजवळ गवत कापण्यासाठी म्हणून सोबत नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर तिच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले.

तिला चाकूचा धाक दाखवून कानातील सोन्याचे वेल आणि पायातील चांदीच्या पट्ट्या जबरदस्तीने काढून घेत आरोपी पसार झाला होता. सदर घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील यांच्या सुचनेप्रमाणे अंंमलदार किशोर वळे, ज्योतीबा पवार, निलेश देसाई यांनी कोंढवा ते वाकड, काळेवाडी, थेरगाव मजुरअड्डा िंपपरी चिंचवडपर्यंत रस्त्यावरील सीसीटीव्हींची तपासणी केली.

Related Posts
1 of 1,608

 हे पण पहा – धक्कादायक.. अल्पवयीन मुलीचे अपहरण

या दरम्यान संशयीत आरोपी हा थेरगाव मजुरअड्डा, काळेवाडी येथून आल्याचे समजले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास केल्यानंतर त्याचे नाव श्रीनिवास जाधव असून तो थेरगाव येथे राहत असून त्याचे मूूळ गाव रायचूर, कर्नाटक असल्याचे समोर आले. त्यानूसार त्याचा शोध सुरू होता. तपासाकामी कोंडवा पोलिसांनी दोन पथके तयार करून थेरगाव आणि कर्नाटकातील मूळ गावात रवाना केली. यातील एका तपास पथकाला तो मूळ गाव रायचूर येथे असल्याचे समजले. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले.

अंगणात आलेल्या कोंबडी सोबत इसमाने केले असे कृत्य की..त्यावर गुन्हा दाखल झाला

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: