रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल बळजबरी ने चोरणारा आरोपी जेरबंद

0 324

अहमदनगर –  रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल बळजबरी ने चोरी करणाऱ्या दोन आरोपीस अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून अटक केली आहे. या कारवाईत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेनेप्रेम नरेंद्र भाकरे (वय १९) आशिष अशोक भाकरे दोन्ही (रा. नागापुर, एमआयडीसी) यांना अटक केली आहे. अहमदनगर पोलीस अधिकक्ष मनोज पाटील,सौरभकुमार अग्रवालअपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी ही कारवाई केली आहे.

या प्रकरणाबद्दल पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक १९ ऑगस्ट २०२१ रोजी दुपाच्या वेळी फिर्यादी वैष्णवी सुभाष लाटे (वय २२, रा. संगम कॉलनी, रेणुका नगर, बोल्हेगांव, ता. नगर) या त्यांचे भावा सोबत अॅक्टीव्हा गाडीवर वडीलांना जेवणाचा डब्बा देवुन घरी जात असताना मोटार सायकलवरुन आलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादीचे भावाच्या हातातील काळ्या रंगाचा मोबाईल फोन एकूण ५ हजार रुपये किंमतीच्या  बळजबरीने हिसकावुन चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुरनं. ५५५/२०२१ भादवि कलम ३९२ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.

हे पण पहा – पोलिसांच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर यांचे आदेशाने  अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने समांतर तपास करीत असताना पोनि अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा प्रेम भाकरे व आशिष भाकरे यांनी केला असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ/बाळासाहेब मुळीक, पोना/विजय टोंबरे, विशाल दळवी, दिपक शिंदे, शंकर चौधरी, पोकॉ/जालिंदर माने, चालक पोहेकॉ/ चंद्रकांत कुसळकर अशांनी मिळून नागापुर, एमआयडीसी येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचे ठावटिकाणाबाबत माहिती घेवून व शोध घेवून आरोपी नामे प्रेम नरेंद्र भाकरे वय १९ व २. आशिष अशोक भाकरे दोन्ही रा. नागापुर, एमआयडीसी यांना ताब्यात घेतले.

Related Posts
1 of 1,608

चिंता कायम ! जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद..

त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून गुन्ह्यातील चोरलेल्या ५,०००/-रु. किं. चा मोबाईल काढून दिल्याने तो जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह एमआयडीसी पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे.पुढील कार्यवाही एमआयडीसी पो.स्टे. करीत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: