OLX वर फसवणुक करणारे आरोपी 24 तासात जेलबंद

अहमदनगर- तोफखाना पोलीसांनी मोठी करवाई करत OLX वर ऑनलाईन फसवणुक करणारे आरोपींना 24 तासात अटक केली आहे. अरबाज युनुस कुरेशी (वय 25) आणि गुड्डु उर्फ मुजेफ आयुब खान (वय 28 वर्षे) यांना या कारवाईत पोलीसांनी अटक केली आहे.
तोफखाना पोलीस ठाण्यात बाबासाहेब दगडु ढोले (रा सावेडी अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि.क. 406 , 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी त्यांची बुलेट मोटर सायकल एम एच 16 , बी जे 3808 हि त्यांना विकायची असल्याने त्यांनी ऑनलाईन OLX यावर फोटो टाकले होते. त्यांनतर आरोपींनी फिर्यादीस फोन करू तुमची मोटर सायकल विक्री करायची आहे ती आम्हांला विकत घेयची आहे असे सांगितले.
त्यानूसार फिर्यादी यांनी दिनांक 30/04/2022 रोजी 14/40 वा चे सुमारास अग्नी शाम कार्यालयाला टि व्ही सेंटर समोर बोलावुन दोन अनोखळी इसम आले त्यातील एक इसमन बुलेट सायकल पाहुन मी बुलेटची चक्कर मारुन पाहतो असे म्हणुन बुलेट घेवुन गेले ते परत आले नाही.
सदर गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने अरबाज युनुस कुरेशी आणि गुड्डु उर्फ मुजेफ आयुब खान यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.
सदर कारवाई मनोज पाटील ,अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल ,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर अनिल कातकाडे यांचे सुचना व मार्गदर्शखाली पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे तोफखाना तपास पथकामधील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे , पोलीस हेड कॉन्स्टेबल शकील सय्यद , पोलीस हेडकॉन्स्टेबल रणजित बारगजे ,पोलीस नाईक अविनाश वाकचौरे , पोलीस नाईक वसिम पठाण, पोलीस नाईक अहमद इनामदार , पोलीस नाईक शैलेश गोमसाळे , पोलीस कॉन्स्टेबल सचिन जगताप , पोकॉ धिरज खंडागळे , पोलीस कॉन्स्टेबल सतिष त्रिभुवन , पोलीस कॉन्स्टेबल शिरीष तरटे , पोलीस कॉन्स्टेबल चेतन मोहिते , पोलीस कॉन्स्टेबल सातपुते यांनी व त्यांचे तपास पथकाने केली आहे .