बुलेट चोरी करणारा सराईत आरोपी मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0 364
अहमदनगर –   १३ नोव्हेंबर रोजी कोपरगांव (Kopergaon) परिसरातून बुलेट (Bullet) चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे.  या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) महेश भाऊसाहेब मंचरे (वय २५, रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर ) याला अटक केली आहे. (Accused of bullet theft arrested in Sarait, local crime branch action)
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार  १३ नोव्हेंबर मच्छिद्र परसराम पोकळे (रा. ओमनगर, ता. कोपरगांव)  यांनी त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये बुलेट पार्कीगसाठी लावली असताना कोणीतरी आज्ञात इसमाने ७० हजार रु. किं.ची बुलेट चोरुन नेली आहे. याघटने नंतर मच्छिद्र परसराम यांनी कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि/अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले. पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि. अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा आरोपी महेश भाऊसाहेब मंचरे याने केल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, पोना शंकर चौधरी, संतोष लोढे, पोकॉ/रविद्र घुंगासे, रणजित जाधव, सागर ससाणे, जालींदर माने, चापोहेकॉ/ उमाकांत गावडे अशांनी मिळून आरोपी महेश भाऊसाहेब मंचरे याला ताब्यात घेवून गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता. हा गुन्हा त्याने त्याचा एक साथीदारासह केला असून सदर गुन्हयातील चोरीस गेलेली ७०, हजार रु. किंमतीची बुलेट काढून दिल्याने आरोपीस मुद्देमालासह कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन, पुढील कार्यवाही कोपरगांव शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई बी. जी. शेखर पाटील विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व संजय सातव   उपविभागीय पोलीस अधीकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.(Accused of bullet theft arrested in Sarait, local crime branch action)
Related Posts
1 of 1,603
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: