सहकारनगर येथील बेलस्टार मायक्रो फायनान्स चे ऑफिस फोडणार्‍या आरोपीस अटक

0 95
Accused of breaking office of Bellstar Micro Finance in Sahakarnagar arrested
 अहमदनगर –  सहकारनगर येथील बेलस्टार मायक्रो फायनान्सचे (Bellstar Micro Finance )ऑफिस फोडणार्‍या आरोपीस  तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५६ हजार ६४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्यादी निलेश विष्णुदास बैरागी, (रा . श्रीरंग नगर शेंडी बायपास , ता . जि . अहमदनगर) यांनी तोफखाना पो.स्टे . येथे फिर्याद दिली होती.
फिर्यादी यांचे बेलस्टार मायक्रोफायनान्स ऑफिस , सहकार नगर पाईपलाईन रोड , अहमदनगर येथील ऑफिस दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून ऑफिस मधील गोदरेज कपाटातील सेल्प लॉकर तोडून ८८ हजार ५७२ किंमतीची रोख रक्कम असा मुद्देमाल अज्ञात चोरटयाने चोरून नेला होता. घटनास्थळी शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे व तोफखाना पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी भेट देऊन पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना सदर तपासाबाबत गोपिनिय सूचना दिल्या होत्या.
 पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळाली की . इसम नाम अशोक तुकाराम दळवी (रा . तुळजाभवानी नगर सिटी प्राईड हॉटेज जवळ , एकविरा चौक अहमदनगर) हा यातील फिर्यादीना ऑफिसमध्ये चहा वाटप करण्याचे काम करत असतो त्यानेच सदरचा गुन्हा केला आहे . तो आता प्राईम केअर हॉस्पिटलच्या समोर एकविरा चौक अहमदनगर येथे त्याचे चहाच्या टपरिवर मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती.
Related Posts
1 of 2,326
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके,पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय जबे पोलीस नाईक संभाजी बडे, पोलीस नाईक शैलेश गोमसाळे ,पोलीस अमलदार सतीश त्रिभुवन,होमगार्ड विशाल दिवटे पथकातील कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे  सदर ठिकाणी जावून आरोपीस अटक केली .
 सदरची कारवाई जिल्हा पोलीस स्टेशन मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके,पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय जबे पोलीस नाईक संभाजी बडे, पोलीस नाईट शैलेश गोमसाळे ,पोलीस अमलदार सतीश त्रिभुवन व होमगार्ड विशाल दिवटे या पथकाने ही कारवाई केली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: