आयपीएलच्या सामन्यात सट्टा लावणाऱ्या आरोपीस अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0 216
Accused of betting on IPL match arrested; Local Crime Branch action

 

अहमदनगर –   अहमदनगर – पुणे हायवे वरती असणाऱ्या चास शिवारात दिल्ली कॅपीटल्स (DC) विरुध्द सन रायझर्स हैद्राबाद (SRH) या आयपीएलच्या (IPL 2022) सामन्यात सट्टा लावणाऱ्या एकास अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Local Crime Branch) कारवाई करत अटक केली आहे. सागर कैलास सपकाळ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

 

सागर कैलास सपकाळ (रा . आगरकर मळा , मोरचुदनगर , अ.नगर) हा फलके फार्म च्या शेजारी नगर पुणा रोड , चास शिवारात  आयपीएलच्या सामन्यात हारजीतवर खेळाडूचे रन्स व विकेटवर बेटींग जुगार हा साजीत पठाण , (रा . घोडेगाव ता नेवासा) याचे सांगण्यावरुन चालवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. या माहितीवरून अनिल कटके यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , पोलीस नाईक लक्ष्‍मण खोकले,पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस लाईक  संदिप कचरु पवार पोलीस नाईक सचिन आडबल या पोलीस स्टाप  बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन छापा टाकून आरोपीला अटक केली असून एक आरोपी साजीद पठाण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

 

 

Related Posts
1 of 2,480

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , पोलीस नाईक लक्ष्‍मण खोकले, पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस लाईक  संदिप कचरु पवार पोलीस नाईक सचिन आडबल पुढील तपास नगर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक राहुल शिंदे हे करत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: