DNA मराठी

जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0 319
Accused jailed for two years; Local Crime Branch action
प्रतिनिधी- DNA मराठी टीम 
अहमदनगर –  अहमदनगर शहरात (Ahmednagar city) फरार आरोपीचा शोध घेत असताना.अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे (Ahmednagar Local Crime Branch) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील राहणारा इसम नामे अहमद अब्बास पठाण , रा . कारवाडी , ता . जि . अहमदनगर यास तडीपार आदेश असताना तो मिरावली पहाड़ परीसरात वावरत आहे . अशी माहिती मिळाल्याने वरील सर्वजण वारुळवाडी परसरातील मिरावली पहाड भागात जावुन सदर इसमाचा शोध घेतला असता तो मिरावली पहाडाचे पायथ्याला दिसल्याने त्यास अटक केली.
Related Posts
1 of 2,448
त्याला  मा . उपविभागीय दंडाधिकारी सो नगर भाग अहमदनगर यांचेकडील आदेश क्रमांक SR NO . १० / २०२१ , दिनांक २८/०२/२०२२ अन्वये दिनांक २८/०२/२०२२ पासुन दोन वर्ष या कालावधीसाठी अहमदनगर जिल्हयाचे बाहेर हद्यपार करण्यात आलेले असुन सदरचा कालावधी अद्याप संपलेला नसल्याचे माहीती असुन ही तो वारुळवाडी शिवार, मिरावली पहाडा जवळ मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेत  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश मोरे यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे ,सफौ राजेंद्र वाघ,सफौ संजय खंडागळे ,पोहेकॉ दिनेश मोरे पोहेकॉ बापुसाहेब रावसाहेब फोलाणे,पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के,पोलीस नाईक भिमराज खर्से, यांनी सदरची कारवाई केलेली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: