उज्वला गोर्डे व कुटुंबिय हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी- किसन चव्हाण

0 155

अहमदनगर :-   नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील अनुसूचित प्रवर्गातील महिला उज्वलाताई आंतोन गोर्डे व त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या अमानुष हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी दिला.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, जिल्हा संघटक फिरोज पठाण, नेवासा तालुकाध्यक्ष हरीशचक्र नारायन, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, तालुका संघटक शेख सलिम जीलानी यांच्यासह उज्वलाताई आंतोन गोर्डे, रमेश दगडू गोर्डे, संदेश आंतोन गोर्डे, आकांक्षा आंतोन गोर्डे आदी उपोषण व आंदोलनात सहभागी झाले होते.

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील उज्वलाताई आंतोन गोर्डे शनिवार दि. २८ ऑगस्ट रोजी कुकाणा येथील संकेत खराडे, रामचंद्र खराडे, भानुदास खराडे, अभिषेख खराडे, वैभव खराडे, सुभाष चौधरी यांच्यासह इतर दहा आरोपींनी लाठ्या, काठ्या, गज व पीव्हीसी पाईप याने अमानुष मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी ४ सप्टेंबर रोजी नेवासा तहसिल कार्यालय व पोलीस स्टेशन समोर प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण व हरिशदादा चक्रनारायन यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले तरीही आरोपींना अटक झाली नाही म्हणून ९ सप्टेंबर रोजी कुकाना येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र अद्यापही सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे गुरुवार दि.१६ सप्टेंबर रोजी नगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर गोर्डे कुटुंबीयांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

हे पण पहा – जन्मदात्रीनेच दिल्या बालिकेला मरणयातना | आजही होत आहेत बालविवाह | ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सदर हल्ल्यात वापरण्यात आलेला जेसीबी व त्याचा मालक यांना अटक करून कडक कारवाई करावी, सदर गुन्ह्यातील आरोपी विठ्ठल पांडुरंग अभंग, अमोल विठ्ठल अभंग, राहुल कांतीलाल मुथा, अर्जुन सदाशिव खराडे, देवराव सदाशिव खराडे यांना सह आरोपी करावे, उज्वला गोर्डे व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, सदर घटनेतील सी. सी. टी. व्ही. फुटेज व व्हायरल व्हिडिओ ताब्यात घेऊन पंचनामा करावा, सदर हल्ला व घटना नियोजन पुर्वक कट कारस्थान करून घडवून आणणाऱ्या गावगुंडांचा शोध घेऊन राजेंद्र रामदास खराडे याच्या मोबाईल वरील कॉल रेकॉर्ड ताब्यात घेऊन कारवाई करावी आदी मागण्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 

सदर घटनेचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्याकडे असून घटना घडून १८ दिवस झाले तरीही या घटनेतील कोणत्याही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खेद व्यक्त केला.

Related Posts
1 of 1,603
या आंदोलनास आकाश जाधव, अतुल पाखरे, विकास रनभिसे, ऋषिकेश परदेशी, जनार्धन धनवडे, बाळासाहेब धनवडे, नितीन कुसळकर, घमाजी जाधव, नाथाभाऊ आल्हाट, आबासाहेब रामफळे, अजित भोसले, मोहन काळे, विशाल साबळे आदींनी पाठिंबा दिला.
 
या वेळी उपोषणकर्ते गोर्डे कुटुंबीय व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्याशी जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील चर्चा केली तसेच सदर प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना अटक करा व गुन्ह्याची उकल करा असे आदेश शेवगावचे उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांना दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. 

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: