कोरोना रजेवर असताना हत्येचा प्रयत्न करुन फरार झालेला आरोपीला धुळे येथून अटक  

0 12
अहमदनगर  –   शिर्डी येथील सागर शेजवळ खुन खटल्यामधील व कोरोना रजेवर असताना हत्येचा प्रयत्न करुन फरार झालेला मुख्य आरोपी विशाल कोते यांस धुळे येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे .
 याबाबत मिळालेली माहिती अशी कि  शिर्डी येथील गाजलेल्या सागर शेजवळ खून खटल्यातील मुख्य आरोपी विशाल अशोक कोते, रा. शिर्डी हा जेलमधून कोरोना रजेवर सुटलेला असताना त्याचे विरुध्द दि. ३०/१२/२०२० रोजी फिर्यादी श्री. राजेन्द्र लालजीभाई भंडेरी, वय- ३९ वर्षे, धंदा- व्यापार, रा. साईश्रध्दा हौसिंग सोसायटी, शिर्डी यांनी तक्रार दिली की, मागील भांडणाचे कारणावरुन आरोपी विशाल अशोक कोते, रा. शिर्डी व त्याचे साथीदारांनी फिर्यादी हे नगर-मनमाड रस्त्यावर थांबलेले असताना त्यांना बळजबरीने रिक्षामध्ये बसवून पिंपळवाडी रोडने रेल्वे पटरीकडे नेवून तेथे आरोपी विशाल कोते याने त्याचे साथीदारासह फिर्यादी यांना मारहाण करुन विशाल कोते याने त्याचेकडील धारदार कोयत्याने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी कडील रोख रक्कम २७,०००/-रु. व मोबाईल बळजबरीने काढून घेतला.
 सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी शिर्डी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 1 ८०१/२०२०, भादवि कलम ३०७, ३६७, ३९४, ४५२, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल कोते हा फरार झाला होता. सदर आरोपीची मागील गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता त्याचा शोध घेणेकामी मा. पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर यांचे सुचनाप्रमाणे पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्वतंत्र पथक नेमले होते.

 

                                                पोलीस अधीक्षकांचा दणका ,अखेर पाटील निलंबित …………..

त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार फरार आरोपीचा शोध घेत असताना पोनि/श्री. अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, सदर फरार आरोपी विशाल कोते हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे लपून बसलेला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/मिथून घुगे, पोना/विशाल दळवी, सुरेश माळी, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/सागर ससाणे, रोहीत येमूल, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून शिरपूर, जि- धूळे येथे मिळालेल्या माहितीवरुन आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेवून आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा तेथून शहादा व पुढे नंदूरबार येथे गेला असल्याची माहिती मिळालेवरुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा नंदूरबार येथे जावून शोध घेतला असता तो नंदूरबार येथून बसने मुंबई येथे जाणेसाठी निघाला असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बसचा पाठलाग करुन आरोपी नामे विशाल अशोक कोते, वय-३० वर्षे, रा. कोते गल्ली, साई सावली निवास, शिर्डी, ता- राहाता यांस पिंपळनेर, जि- धूळे येथून ताब्यात घेवून अहमदनगर येथे आणून शिर्डी पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कार्यवाही शिर्डी पो.स्टे. करीत आहेत.
Related Posts
1 of 1,292
आरोपी विशाल अशोक कोते हा शिर्डी येथील गाजलेल्या सागर शेजवळ खून खटल्यातील आरोपी असून तो २०१५ पासून जेलमध्ये असून सध्या कोरोना रजेवर आहे. रजेवर असताना वरील गंभीर स्वरुपाचा गुन्हा करुन तो फरार झालेला होता. त्याच्यावर  यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) शिर्डी पो.स्टे. गुरनं. १६६/२००९, भादवि कलम ३९९ प्रमाणे
२) शिर्डी पो.स्टे. गुरनं. १ ३७/२००९, भादवि कलम ३२६, ३२५, ५०४ प्रमाणे
३) शिर्डी पो.स्टे. गुरनं. 1 २६/२०१०, भादवि कलम ३५३, ३४ प्रमाणे
४)शिर्डी पो.स्टे. गुरनं. १६४/२०११, भादवि कलम ३९२ प्रमाणे
५)शिर्डी पो.स्टे. गुरनं. १ १२०/२०१२, भादवि कलम ३८४, ५०४, ५०६ प्रमाणे
६)शिर्डी पो.स्टे. गुरनं. २४६/२०१४, भादवि कलम ३९४, ३९२, ३४ प्रमाणे
७)शिर्डी पो.स्टे. गुरनं. 1 २१०/२०१४, भादवि कलम ३२६, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे
८)शिर्डी पो.स्टे. गुरनं. 1 ८४/२०१४, भादवि कलम ३९४, ४४८, ३४ प्रमाणे
९) उमरी पो.स्टे. नांदेड गुरनं. १४०/२०१४, भादवि कलम ३२४, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४
१०) शिर्डी पो.स्टे. गुरनं. 1 १६२/२०१५, भादवि कलम ३०२, सह अ.जा.ज.अ.प्र.का. कलम ३(१), (३)(१०) वगैरे प्रमाणे.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती.दिपाली कांबळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: