तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न , आरोपीला अटक

0 273

 कल्याण –  कल्याण (Kalyan City) रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहत उभा असताना प्रवाशाला ( passenger ) थेट तलवारीचा (sword) धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  प्रवाशाने आरडाओरड केल्याने फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. रेल्वे पोलिसांनी या घटनेनंतर निखिल वैरागर या आरोपीला अटक केली आहे. (Accused arrested for trying to rob a passenger with a sword)

या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी कि आंबिवली येथे राहणारा तरुण प्रीतम पाटील हा 29 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावरील 2 नंबर फलाटावर पुलाच्या खाली लोकलची वाट पाहत उभा होता. इतक्यात पुलावरून निखिल वैरागर हा 21 वर्षीय तरुण त्याच्याजवळ आला. निखिलने आपल्या शर्टाच्या आत लपवून ठेवलेली तलवार बाहेर काढली. त्यानंतर तलवारीचा धाक दाखवत आरोपीने प्रीतमला जवळ असलेले पैसे आणि मोबाईल दे, नाहीतर ठार मारेन अशी धमकी दिली.

हे पण पहा –  आमदार निलेश लंके यांच्या कामाचं राज्यमंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक

सुदैवाने लोकलच्या प्रतीक्षेत उभा असलेला आणखी एक प्रवासी विक्की मोरे तलवार बघून पुढे सरसावला. दोघांनी आरडाओरड केल्याने ड्युटीवर असलेल्या पोलिसांचं लक्ष गेलं. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत निखिलला ताब्यात घेतलं. कल्याण जीआरपीमध्ये निखिलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(Accused arrested for trying to rob a passenger with a sword)

राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू?; आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

Related Posts
1 of 1,487
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: