डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून रोख रकमेची लुटमार करणारे आरोपी जेरबंद

0 874

अहमदनगर –   मागच्या आठवड्यात अहमदनगर शहरातील झोपडी कॅन्टीन परिसरात असलेल्या प्रकाश वाईन्स या दुकान मनेजरच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून त्याच्या जवळ असणारी रोख रकमेची लुटमार (Robbing Cash ) करण्याची घटना घडली होती. या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Local Crime Branch) कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने लखन नामदेव वैरागर,प्रमोद बालू वाघमारे,विशाल भाऊसाहेब वैरागर,दिपक राजू वाघमारे या आरोपींना अटक केली आहे.

या घटनेबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी कि दि. १२ सप्टेंबर रोजी प्रकाश वाईन्सचे मॅनेजर आशीर बशीर शेख ( वय २९ वर्षे, रा. पंचवटीनगर, भिस्तबाग, सावेडी, अहमदनगर)  हे रात्री १०च्या सुमारास दुकान  बंद करुन दिवसभर वाईन शॉपमध्ये जमा झालेली रक्कम बॅगमध्ये ठेवून बॅग मोटार सायकलचे टाकीवर ठेवून घरी निघाले असता सारस्वत बँकेजवळ पाठीमागून काळ्या रंगाचे, विना नंबरचे पल्सर मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमापैकी मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या डोळ्यावर मिरची पावडर फेकली त्यावेळी आशीर बशीर शेख  यांनी रस्त्याचे कडेला त्यांची मोटार सायकल उभी केली असता सदर इसमाने शेख यांचे मोटार सायकल जवळ येवून पुन्हा त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मोटार सायकलचे पेट्रोल टाकीवर ठेवलेली १० लाख ७० हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग बळजबरीने चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत तोफखाना पो.स्टे. येथे गुरनं. ८०६/२०२१ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर, मा. अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग तसेच अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून गुन्हा घडले ठिकाणचे निरीक्षण करुन फिर्यादी यांचेकडून गुन्ह्यातील आरोपी बाबत माहिती घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे आदेशाने पोनि/ अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना सूचना देवून आरोपींचा शोधार्थ रवाना केले.

त्याप्रमाणे पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, पोहेकों/संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, पोना/ रवि सोनटक्के, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, संदीप चव्हाण, भरत बुधवंत, पोकॉ/ योगेश सातपूते, सागर ससाणे, कमलेश पाथरुट हे गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेत असताना पोनि/ अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा प्रकाश वाईन्स या दुकाणामध्ये काम करणारा कामगार लखन वैरागर, (रा. नागापूर, अहमदनगर) याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचे ठावठिकाणा बाबत गोपनिय माहिती घेवून व आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे लखन नामदेव वैरागर, (वय २९ वर्षे, रा. सेंट मेरी चर्च पाठीमागे, नागापूर, अहमदनगर) यास प्रथम ताब्यात घेतले. त्याचेकडे नमुद गुन्ह्याबाबत व गुन्ह्यातील साथीदाराबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवून लागला. त्यास विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने व त्याचे इतर पाच साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपीतांचा शोध घेवून आरोपी नामे प्रमोद बालू वाघमारे, (वय- २३ वर्षे, रा. आण्णाभाऊ साठे समाज मंदीर शेजारी, नागापूर, अहमदनगर)  विशाल भाऊसाहेब वैरागर, (वय- २५ वर्षे, रा. रस्तापूर, ता. नेवासा)  आणि  दिपक राजू वाघमारे (वय २० वर्षे, रा. सेंट मेरी चर्च पाठीमागे, नागापूर, अहमदनगर) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. तसेच उर्वरित दोन साथीदारांचा शोध घेतला परंतू ते मिळून आले नाहीत.

हे पण पहा – जन्मदात्रीनेच दिल्या बालिकेला मरणयातना | आजही होत आहेत बालविवाह | ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,357

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील चोरलेल्या रोख रकमेबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे वाटणीस आलेली ५ लाख २० हजार रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्याचे वेळी वापरलेल्या ३ लाख ४०हजार रुपये किंमतीच्या  तीन मोटार सायकल व ४२ हजार ५०० रुपये किंमतीच्या चार मोबाईल काढून दिल्याने एकूण ९ लाख ०२ हजार ५०० रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना मुद्देमालासह तोफखाना पो.स्टे. येथे हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे. करीत आहेत.

सदरची कारवाई  मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर,  सौरभकुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, व  विशाल दुमे  उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार केलेली आहे.

मतदान कार्ड येणार घरी , या पद्धतीचा वापर करून बनवा आपला ऑनलाईन ओळखपत्र

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: