तीनपत्ती खेळावरून तरुणाचा चाकूने हल्ला करुन खून, आरोपीला अटक

0 321

पुणे   मावळ तालुक्यात मित्रांमध्ये सूरु असलेल्या तीनपत्ती खेळावरून एका तरुणाचा चाकूने हल्ला करुन खून (murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाबुद्दीन अन्सारी (वय-21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.(Accused arrested for stabbing youth to death)

रियाज निसार अन्सारी यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जलाल शेख, मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्त्राईल अन्सारी (तिघे रा. इंदोरी) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

मतदार यादीत तुमचे नाव आहे का? तपासा या सोप्या पद्धतीचा वापर करुन

Related Posts
1 of 1,608

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, आरोपी आणि मयत हे चौघे इंदोरी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. शनिवारी रात्री ते तीनपानी पत्ते खेळत होते. या खेळाच्या नियमावरुन शाबुद्दीन आणि जलाल शेख यांच्यात वाद झाला. त्यानंतर जलाल शेख त्याच्या घरी गेला. तो त्याच्या दोन मेहुण्यांसोबत चाकू घेऊन परत फिर्यादी यांच्या खोलीत आला. तिघांनी शाबुद्दीनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्त्राईल अन्सारी यांनी शाबुद्दीनला पाठीमागून घट्ट पकडले. तर जलाल याने शबुद्दीनच्या छातीवर, पोटावर, डोळ्यावर चाकूने भोकसले. यामध्ये गंभीर जखमी होऊन शाबुद्दीनचा मृत्यू झाला.(Accused arrested for stabbing youth to death)

हे पण पहा- दंगल भडकवण्यामागे अनिल बोंडेचा हात – नवाब मलिक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: