वाहन चालकांना धारदार हत्याराने मारहाण करुन लुटमार करणारे आरोपी जेरबंद

0 379
Accused arrested for robbing motorists with a sharp weapon

अहमदनगर –   अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Local Crime Branch) कारवाई करत अहमदनगर – मनमाड महामार्गावर रात्रीचे वेळी हॉटेल समोर विश्रांतीसाठी थांबलेल्या वाहन चालकांना धारदार हत्याराने(Sharp Weapon) मारहाण करुन लुटमार (Robbing )करणारे आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने समीर उमर कुरेशी,सोहेल जावेद पठाण आणि सौरभ रामदास सातोटे या आरोपींना  अटक केली आहे.

या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी कि दि. १९ सप्टेंबर रोजी उंकार उर्फ अर्जुन शंकरलाल (मेवाडा, रा. पिरझलीर, ता. बडनगर, जि. उज्जैन, मध्यप्रदेश) व त्यांचे मित्र ड्रायव्हर गोकूळसींग रजपूत असे दोघे टेम्पो नं. एमपी-०९- जीजी/२२२६ व टेम्पो नं. एमएच-०४-जीएफ ७२६४ असे दोन टेम्पो नगर-मनमाड महामार्गावरील येसगांव फाटा येथील राजस्थान ढाव्यासमोर उभे करुन कॅबीनमध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे टेम्पोचे कॅबीनचा दरवाजा उघडून  उंकार  यांचे पॅन्टचे खिशामध्ये हात घातला असता जाग आल्याने  उंकारने चोरट्याचा हात पकडून आरडाओरड केली असता आरोपीने फिर्यादीचे हातावर, दंडावर, मनगटावर, पायावर कमरेवर चाकूने वार केले. त्याचवेळी  उंकारचे मित्र गोकूळसिंग रजपूत हे सोडविण्यास मध्ये आले असता आरोपींनी त्यांचे पोटावर चाकूने वार करुन  उंकार  यांचा १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरुन नेला. सदर घटनेबाबत कोपरगांव तालूका पो.स्टे. येथे गुरनं. ३४१/२०२१ भादवि कलम ३९४, ३९७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे आदेशाने पोनि / अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून तपासाबाबत सुचना दिल्या होत्या. त्या सुचनाप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि/अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा समीर कुरेशी, (रा. सुभाषनगर, कोपरगाव) याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, सफौ/मोहन गाजरे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, बाळासाहेब मूळीक, पोना/विशाल दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/सागर ससाणे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, रणजित जाधव, राहूल सोळंके, चालक पोहेकॉ/बबन बेरड अशांनी मिळून कोपरगांव येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे १) समीर उमर कुरेशी, (वय १९ वर्षे, रा. सुभाषनगर, धारणगाव रोड, कोपरगाव) यांस ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून नमुद गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार सोहेल पठाण व सौरभ सातोटे, (दोघे रा. सुभाषनगर, कोपरगाव) अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने त्यावरुन आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे २) सोहेल जावेद पठाण, (वय १८ वर्षे, रा. सुभाषनगर, धारणगाव रोड, कोपरगाव) ३) सौरभ रामदास सातोटे, (वय १८ वर्षे, रा. सुभाषनगर, धारणगाव रोड, कोपरगाव, ह.रा. समतानगर, नाशिक रोड, नाशिक) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज कावासाकी मोटार सायकल व दोन मोबाईल असा एकूण ४१ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

संघटीत गुन्हे करणारे कुख्यात गुन्हेगार व त्याचे टोळीतील सदस्यांविरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई

Related Posts
1 of 2,107

यातील आरोपी नामे सोहेल जावेद पठाण याचेवर यापुर्वी कोपरगांव शहर पोलीस स्टेशन ८६० / २०२० भादवि कलम ३९७,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपींना मुद्देमालासह कोपरगाव तालुका पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही कोपरगाव तालुका पो.स्टे. करीत आहेत. सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर  दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व  संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार केलेली आहे.

 हे पण पहा  – Ahmednagar breaking news | आयुर्वेद कॉनर जवळ बर्निंग कारचा थरार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: