शंभर पेक्षा जास्त तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आरोपीला अटक

0 350

पिंपरी चिंचवड –  पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करत एका इसमाला अटक केली आहे. या इसमाने देशातील एक नव्हे तर शंभर पेक्षा जास्त तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये लुटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमराज थेवराज डिक्रूझ (Premraj Thevaraj Dcruz) असं या लखोबा लोखंडेचं नाव आहे. तो मुळचा तामिळनाडू इथं राहणार आहे. प्रेमराजने शेकडो महिलांना लग्नाचं आमिष दाखवून कोट्यवधींची माया जमवली आहे.

प्रेमराज हा अविवाहित आणि खासकरून विधवा, परित्यक्ता महिलांना हेरून त्यांना आपल्या प्रेमात पाडायचा.आणि मी काँट्रॅक्टर आहे ,बिझनेसमन आहे, बिल्डर आहे असं खोटं सांगून विश्वास संपादन करायचा. त्यानंतर त्याचा प्रेमाचा ड्रामा सुरू व्हायचा. पुढे जाऊन त्याने अनेक जणींसोबत साखरपुडाही केला. एवढंच नाहीतर लग्नाचं आमिष दाखवून त्या महिलांकडून लाखो रुपये उकळायचा.

धक्कादायक ! झोपलेल्या भावंडांवर घरात घुसून गोळीबार, एक जखमी

Related Posts
1 of 1,481

मात्र एका महिलेने पोलिसांकडे डिक्रूझ विरुद्ध तक्रार केली. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि डिक्रूझच्या साळसूदपणाचा बुरखा फाडून त्याचा विकृताचा चेहरा समोर आणला. पोलिसांनी जेव्हा त्याला पकडण्यासाठी सापळा रचला, तेव्हा त्याची ओळख पटवण्यासाठी महिलेने ठरलेल्या इशाऱ्या प्रमाणे चेहऱ्यावरील केस तीन वेळा मागे घेतले आणि आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

हे पण पहा – रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: