Accused arrested for robbery in various talukas of the district
प्रतिनिधी DNA मराठी टीम
अहमदनगर –  अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जिल्हयातील श्रीरामपूर, शिर्डी, नेवासा, पाथर्डी, सोनई, जामखेड तालुक्यात आणि शहरातील  एमआयडीसी परिसरातील दरोडा, जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.  सचिन भोसले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून  नऊ लाख बारा हजार रुपये किंमतीच्या १७२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.  तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात आठ गुन्हांची नोंद आहे.

घराचा दरवाजा तोडुन, घरात प्रवेश करुन, कपाटातील सामानाची उचका पाचक करुन, घरातील पेट्या घराचे बाहेर घेवून जावुन १,९९,३५०/- रु.कि.चे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल बळजबरीने चोरुन घेवुन गेल्याची तक्रार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये  फिर्यादी दादासाहेब ज्ञानदेव मरकड, (वय ४०, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) यांनी दिली होती. भादविक ३९४, ४५९, ३४ प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर  पोनि / अनिल कटके स्थागुशा यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन सपोनि /सोमनाथ दिवटे, पोसई / सोपान गोरे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, भाऊसाहेब कुरुंद, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, संदीप पवार, पोना / ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, संदीप दरदंले, सचिन आडबल, विशाल दळवी, लक्षमण खोकले, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/रणजीत जाधव, रविंद्र घुंगासे, जालिंदर माने, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, रोहित येमुल, मयुर गायकवाड, विजय घनेघर, मच्छिद्र बर्डे, विनोद मासाळकर, चापोहेकॉ/ उमाकांत गावडे व चापोना/भरत बुधवंत यांना सुचना व मार्गदर्शन करुन कारवाई करणे बाबत आदेशीत दिले होते.
नमुद पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार नेवासा शहर व परिसरात पेट्रोलिंग करत असतांना अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी सचिन भोसले हा त्याचे साथीदारासह नेवासा येथे चोरी केलेले सोन्याचे दागिने मोडण्यासाठी घेवुन येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने  कटके यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहिती पथकास कळविली. माहिती प्राप्त होताच पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सलाबतपुर, ता. नेवासा या परिसरातून आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेतली आणि मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सापळा लावला असता  सलाबतपुर कडुन खडकाफाट्याकडे एका काळ्या रंगाचे मोटार सायकलवर अज्ञात तीन इसम आले पोलीस पथकाची खात्री होताच त्यांना थांबण्याचा इशारा करताच त्यांनी मोटार सायकल जोरात चालवुन नेवासा फाट्याच्या दिशेने जोरात जाव ताच मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमास कॉलरला पकडुन धरुन ठेवले त्याच वेळी मोटार सायकलवरील पुढे बसलेले दोन इसम मोटार सायकल जोरात चालवुन नेवासा फाट्याच्या दिशेने पळुन गेले . ताब्यात घेतलेल्या आरोपीस त्याचे नाव पत्ता विचारले असता सचिन सुरेश भोसले (वय २३, रा सलाबतपुर, ता. नेवासा) असे असल्याचे सांगीतले. तसेच पळून गेलेल्या इसमांबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने त्यांची नावे १) असिफ नासिर शेख रा. वांळुज, जिल्हा औरंगाबाद, २) गुलब्या शिवाजी भोसले रा. गोंडेगांव, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीचे  पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडून नऊ लाख बारा हजार रु. किंमतीचे ९७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळुन आले. सदर मिळुन आलेल्या दागिन्या बाबत त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने मागिल तीन चार महिन्यात श्रीरामपूर, नेवासा, कुकाणा, सोनई, पाथर्डी, जामखेड व एमआयडीसी परिसरात साथीदारासह चो-या केल्या असुन नेहमी प्रमाणे सदरचे सोने आम्ही आमचे ओळखीचा सोनार दादा संपत म्हस्के (रा. नेवासा) याचेकडे मोडण्यासाठी घेवुन चाललो होतो अशी माहिती दिली. नमुद माहितीचे आधारे अहमदनगर जिल्ह्यातील दाखल गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे एकुण ०८ गुन्हे दाखल असुन आरोपीनी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!