बेलवंडी पोलीस ठाण्यात लाचेची मागणी गुन्हा दाखल,आरोपी ताब्यात

0 469

श्रीगोंदा- दाखल गुन्हा बंद करण्यासाठी बावीस हजारांची लाच मागणाऱ्या बेलवंडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रकाश बारवकर याच्याविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,बेलवंडी पोलीस ठाण्यात येळपणे येथील एक मिसिंग बाबतचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार  प्रकाश बारवकर हा करत होता. या  मिसींग गुन्ह्यात  मदत करुन मिसिंग प्रकरण बंद करण्यासाठी बारवकर याने पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती.

संबधित तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने १७ सप्टेंबर रोजी अहमदनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. संबंधित तक्रारदार व आरोपी बारवकर यांच्यात तडजोड होऊन बावीस हजाराची मागणी केली व ही रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाच स्वीकारण्याअगोदर आरोपी बारवकर याला शंका आल्याने त्याने रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी  भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले आहे.

राज्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ११ जणांवर गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,481

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर ,पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे,  पो हवा. संतोष शिंदे, पो ना.रमेश चौधरी, विजय गंगुल,  पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड , चालक पोलीस हवालदार हारुन शेख, पोलीस नाईक- राहुल डोळसे. यांनी ही कारवाई केली.

हे पण पहा  – Ahmednagar breaking news | आयुर्वेद कॉनर जवळ बर्निंग कारचा थरार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: