DNA मराठी

इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन तरूणीची बदनामी करणाऱ्या आरोपीला अटक

0 199
Shocking! A mentally ill man stabbed his wife to death

अहमदनगर – तरूणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंट तयार करून बदनामी करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तेजस भिवसेन ठाणगे (वय २१ रा. तलाठी कार्यालयाशेजारी, सावेडी गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणीने फिर्याद दिली होती. सायबर पोलिसांनी भादंवि कलम ५०० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटीलं, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे,

Related Posts
1 of 2,493

अरूण सांगळे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले. बनावट अकाऊंट तयार करून फिर्यादी तरुणीची बदनामी करणारा आरोपी ठाणगे यांचे नाव तपासाअंती समोर आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक अकाऊंट हे प्रायव्हसी लॉक करावे, अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: