रात्रीचे वेळी घराच्या खिडक्या तोडून चोरी करणारा आरोपी जेरबंद

0 268

अहमदनगर – २२ जुलै रोजीचे रात्री फिर्यादी दिलीप आत्माराम अकोलकर, (वय ६५ वर्षे, रा. करंजी, ता. पाथर्डी) यांचे राहते घराचे बाथरुमची सिमेंटची खिडकी कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून त्यावाटे घरामध्ये प्रवेश करुन घरातील सोन्याचे दागिणे व मोबाईल असा एकूण ४६,०००/-रु. किं. चा ऐवज चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत पाथर्डी पो.स्टे. येथे गुरनं. ५३३/२०२९, भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द दाखल करण्यात आलेला होता.

वरील नमुद गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि/ अनिल कटके यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, सदरचा गुन्हा हा कृष्णा काशिद, रा शेकटे, ता. पाथर्डी याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील सपोनि/ गणेश इंगळे, पोहेकॉ/विश्वास बेरड, संदीप पवार, पोना / सुरेश माळी, दिपक शिंदे, पोकॉ/रविन्द्र घुंगासे, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, चालक चंद्रकांत कुसळकर असे नमुद आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी अहमदनगर शहरातील सिध्दार्थनगर परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिध्दार्थनगर परिसरामध्ये आरोपीचा शोध घेतला सदर आरोपी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्यास त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव, पत्ता कृष्णा महादेव काशिद, वय- २४ वर्षे, रा. शेकटे, ता. पाथर्डी असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे नमुद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती देवून गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी ३,०००/-रु. किं. चा रेड मी कंपणीचा मोबाईल काढून दिल्याने सदरचा मोबाईल जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह पाथर्डी पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही पाथर्डी पो.स्टे. करीत आहेत.

साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक

Related Posts
1 of 1,608

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. सुदर्शन मुंढे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार केलेली आहे.

हे पण पहा – रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: