महामार्गावर गाड्या आडवुन दरोडा टाकणारे आरोपीला मुद्देमालसह अटक …

0
श्रीगोंदा  :- दि 11जुले रोजी निलेश चतरसिंग लोदी वय 19 वर्षे रा.बधोरीया जिल्हा शिवपुरी मध्य प्रदेश यांनी पोलीस स्टेशन श्रीगोंदा येथे फिर्याद दिली की,दिनांक 06/07/2021 रोजी त्यांनी कन्नौज (उत्तर प्रदेश) येथुन 30 टन मक्याचे पोते ट्रक क्र एम.पी.09 एच.एच.9532 यामध्ये भरुन सांगली येथे पोहोच करण्याकरीता निघाले असताना दिनांक10 जुले रोजी रात्री 01/30 वा.लोणी व्यंकनाथ येथील रेल्वे गेटच्या पुढे त्यांची ट्रक आज्ञात आरोपींनी आडवुन ती बाबुर्डी शिवारातील वस्तीजवळ घेवुन गेले.(Accused arrested for blocking vehicles on highway)
तेथे आरोपींची चौदा टायर ट्रक मध्ये फिर्यादीचे ट्रकमधील 25 टन मका बळजबरीने भरुन आरोपी निघुन गेले अशी फिर्याद दिले वरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर 1 452/2021भा.द.वि.क 392,395 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मका चोरण्याकरीता आरोपींनी बारा टायरचा  ट्रक वापरला आहे त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देवुन रवाना केले.
  त्यांनी मिळालेल्या माहितीतील ट्रक चा शोधदौंड,काष्टी,मांडवगण,हंगेवाडी,मढेवडगाव परीसरात घेतला,CCTV फुटेज चेक केले, नागरीकांना विचारपुस केली असता सदरचा ट्रक हा काष्टी येथे मिळुन आला.त्या ट्रकमध्ये मकाचे दाने मिळुन आले त्यामुळे संशय बळावल्याने अधिक माहीती घेतली असता व तांत्रिक विश्लेषन केले असता सदरचा गुन्हा आर्यन शंकर कांबळे वय 24 वर्षे रा.सांगवी ता.फलटण ता.सातारा संजय बबन कोळपे वय 46 वर्षे,रा बोरी ता.श्रीगोंदा गणेश श्रीमंत गिरी वय 25 वर्षे रा.श्रीगोंदा कारखाना भाऊसाहेब गंगाराम पालवे वय 21 वर्षे रा.श्रीगोंदा कारखाना ता.श्रीगोंदा व ईतर  अशांनी केला असल्याचे उघड झाले.
Related Posts
1 of 1,153
 त्यावरुन त्यांना ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात चोरलेला खालील मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला.या आरोपीकडून आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला बारा टायर ट्रक क्र- MH-16 CC 5982,आरोपींनी गुन्ह्यात चोरलेली 25 टन मका,आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली सी.डी.डीलक्स मोटार सायकल तीचा क्र MH-14Cv 5430,आरोपींनी ट्रक ड्रायव्हर यांचा चोरुन नेलेला विवो कंपनीचा मोबाईल असा एकुण 25,66,000/- रु अंदाजे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा अत्यंत क्लिष्ट व गंभीर स्वरुपाचा असताना तो उघडकीस आणुन आरोपी अटक करण्यास व मुद्देमाल हस्तगत करण्यास श्रीगोंदा पोलीसांना यश आले आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोसई अमित माळी,पोकॉ वैभव गांगर्डे हे करीत आहे.मुख्य आरोपी आर्यन शंकर कांबळे वय 24 वर्षे रा सांगवी ता.फलटण जि.सातारा हा सातारा जिल्ह्यातुन एक वर्षाकरीता हद्दपार होता.त्याचेवर पुर्वी दाखलअसलेले गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये. वडगाव निंबाळकर पुणे ग्रामिण पो.स्टे.गु.रजि.नं.166/2016 भा.द.वि.क.379,34 प्रमाणे फलटण तालुका पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 497/2019 मुंबई पोलीस कायाद कलम 142 प्रमाणे,फलटण तालुक पोलीस स्टेशन गु.रजि.नं.03/2018 मुंबई पोलीस कायाद कलम 37(1)(3),135 प्रमाणे, फलटण तालुक पोलीस स्टेशन गु.रजि.नं.69/2017 भा.द.वि.क.379 प्रमाणे,फलटण तालुक पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 219/2017 भा.द.वि.क.379 प्रमाणे सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक  मनोज पाटील साहेब,अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब,यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामराव ढिकले,स.पो.नि.तेजनकर,पोसई अमित माळी,पोहेकॉ अंकुश ढवळे,पो.कॉ दादासाहेब टाके,पोकॉ किरण बोराडे, पोकॉ गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे,पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ वैभव गांगर्डे,पोकॉ प्रशांत राठोड यांनी केली आहे.(Accused arrested for blocking vehicles on highway)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: