चोरीच्या गुन्ह्यातील मागच्या दहा वर्षापासून वॉरंट मध्ये फरार असेलेल्या आरोपीला अटक  

0 11

अहमदनगर –  चोरीचे गुन्ह्यातील मागच्या  दहा वर्षापासून वॉरंट मध्ये फरार असलेला चोरटाला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचा दीपक मारुती जाधव असे नाव आहे .

या प्रकरणाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि सन २०१० मध्ये एमआयडीसी परिसरामध्ये साईबन रोडवर रस्त्याचे कडेला उभे असलेल्या आयशर टेम्पोचे टायर चोरुन नेल्याबाबत आरोपी नामे दिपक मारुती जाधव, रा. गजराजनगर, अहमदनगर याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस गुन्ह्यात अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीस जामिनावर मुक्त केले होते. तेव्हा पासून सदरचा आरोपी हा फरार झालेला होता. सदर फरार आरोपीचा शोध घेवून त्यास हजर करणे बाबत मा. अहमदनगर न्यायालयाने आदेश दिल्याने सदर आदेशानुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंममलदारांचे स्वतंत्र पथक नेमले होते.

शरद पवार तुम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला येऊ नका ,काँग्रेस नेत्याचं पत्र

त्याप्रमाणे पथकातील स्पोनि/सोमनाथ दिवटे, पोसई/गणेश इंगळे, सफौ/नानेकर, पोहेकॉ/संदीप घोडके, पोना/संदीप पवार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के पोकॉ/कमलेश पाथरुट, योगेश सातपूते असे सदर आरोपीचा शोध घेत असताना पोनि/श्री. अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, आरोपी दिपक जाधव हा त्याचे घरी गजराजनगर येथे आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गजराजनगर येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेवून सापळा लावून आरोपी नामे दिपक मारुती जाधव, वय-३७ वर्षे, रा. गजराजनगर, अहमदनगर यास ताब्यात घेवून एमआयडीसी पो.स्टे. येथे हजर केले आहे. पुढील कार्यवाही एमआयडीसी पो.स्टे. करीत आहेत.

देशात स्थापन होणार तिसरी आघाडी , शरद पवार यांनी दिले संकेत 

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

वर्षाभरात टोल घेण्याची व्यवस्था पूर्णपणे रद्द केली जाईल – नितीन गडकरी 

 

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: