खुनाच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीस अटक, लोणी पोलीसांची कारवाई

0 277

अहमदनगर –   मागच्या तीन वर्षांपासून खुनाच्या गुन्हयात फरार असलेल्या आरोपीस  लोणी पोलिसांनी कारवाई करून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी  अक्षय बनसोड दत्तात्रय (रा. लोणी बु  ता. राहाता जिल्हा अहमदनगर) यास अटक केली आहे. अहमदनगर पोलीस अधीक्षक माजोन पाटील, डॉ. दिपाली काळे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर,  संजय सातव सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो शिर्डी विभाग शिर्डी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान पाटील, सहा फौजदार विठ्ठल घोडे, पो.हे. कॉ संपत जायभाये यांनी केली आहे.

या प्रकरणाबद्दल पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि दि. ०१ डिसेंबर २०१९ रोजी लोणी बु  शिवारातील हसनापुर रोड लगत हॉटेल साईछत्रपती येथे रात्री  ०८.३० वाजण्याचे सुमारास  आशा आब्बु कुरेशी वय ४५ वर्षे रा. वॉर्ड नंबर २ बीफ मार्केट जवळ श्रीरामपूर जि. अहमदनगर हिचा मयत मुलगा नामे फरदीन आब्बु कुरेशी वय १८ वर्षे रा.वार्ड नंबर २ बीफ मार्केट जवळ श्रीरामपूर यास आरोपीतांनी संगमनत करुन अज्ञात कारणावरुन बंदुकीची गोळी घालुन जिवे ठार मारला अशी फिर्यादीवरून ०३५९/२०१९ भा.द.वि.क. ३०२, २०१,१४३, १४७, १४८, १४९, आम अॅक्ट कलम ३/२५प्रमाणे दिनांक ०२/१२/२०१९ रोजी दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील ६ आरोपी यांना गुन्हा दाखल झालेनंतर अटक करण्यात आली होती.

हे पण पहा – पोलिसांच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

Related Posts
1 of 1,487
सदर गुन्ह्यातील आरोपी अक्षय बनसोड  दत्तात्रय रा. लोणी बु  ता. राहाता जिल्हा अहमदनगर हा गुन्हा दाखल झालेपासुन फरार असुन तो आजपावेतो वास्तव्य वय २५ वर्ष बदलुन वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता सदर फरार आरोपी अक्षय दत्तात्रय बनसोड हा दिनांक ०५/०९/२०२१ रोजी लोणी परीसरात आलेबाबत सपोनि समाधान पाटील प्रभारी अधिकारी अहमदनगर यांना गोपनीच बातमी मिळाल्याने त्यांनी लोणी पोलीस स्टेशनचे सहा फौजदार विठ्ठल घोडे, पो.हे.कॉ संपत जायभाये, पो.ना. दिपक रोकडे यांना सदर बाबत माहीती देवून त्याचा लोणी परीसरात शोध घेवुन त्यास ताब्यात घ्या असे कळविल्याने सदर आरोपी अक्षय दत्तात्रय बनसोड यास शिताफीने ताब्यात घेवून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: