बस आणि दुचाकी मध्ये अपघात; दोन जण जखमी

प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार
नंदुरबार- शहरातील मोठा मारुती मंदिराजवळ दुचाकी व बस यात अपघात झाला असून दोन जण जखमी झाले आहे तर लहान बालक दूर फेकला असल्याने त्याला थोड्या प्रमाणात दुखापत झाली आहे.
अमळनेर हुन नंदुरबारकडे येणारी बस व दुचाकीची अपघात झाला आहे. बसला ओव्हरटेक करत असताना दुचाकीचा तोल जाऊन दुचाकी चाक खाली दबलेली यात जीवितहानी झाली नसली तरीही महिला व पुरुष व लहान बालक जखमी झाले आहेत.
जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आणि शहराच्या मध्यवर्ती भागात अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली.