Accidental death of Shiv Sena taluka deputy chief Ganesh More Accidental death of Shiv Sena taluka deputy chief Ganesh More
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
 
बीड –   बीडहून आपल्या गावी लिंबागणेश येथे दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत शिवसेनेचे ( Shiv Sena) तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे (40) (Ganesh More) यांचे मुत्यू झाले आहे. दुचाकीला धडक लागल्याने मोरे हे जखमी झाले होते आणि त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मुत्यू झाला. ते मागच्या वीस वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करत होते तसेच ते एक उत्तम कबड्डीपटू होते.

शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गणेश मोरे हे बीडहून लिंबागणेश या त्यांच्या गावी दुचाकी (एम.एच.23 ए.व्ही 0017 ) ने निघाले होते. वाटेत बीड-मांजरसुंबा महामार्गावर मंझेरी फाट्यावरील हॉटेल बळीराजा समोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली होती. या अपघातात ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळून डोक्याला गंभीर मार लागला होता.

या अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस पीएसआय डी.बी आवारे, जमादार आनंद मस्के, मदतनीस जी.व्ही.कांदे, वाहनचालक खय्यूम खान यांच्यासह महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी भेट देवून पाहणी केली. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा रूग्णालयात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. पोलिसांनी गणेश मोरे यांचा मृतदेह ताब्यात घेवून तो बीड जिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मोरे यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *