श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात , एकाचा जागीच मुत्यू, अज्ञात चालकावर गुन्हा दाखल

0 436
Accident in Shrigonda taluka, one killed on the spot, case filed against unknown driver
 श्रीगोंदा :-  आढळगाव येथील रहिवासी असलेले मच्छिंद्र भगवान काळे (Machhindra Bhagwan Kale) (वय वर्षे ४०) यांचा काल दुपारी ३:०० च्या सुमारास स्विफ्ट गाडीने मोटरसायकल ला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आहे. (Accident in Shrigonda taluka, one killed on the spot, case filed against unknown driver)

याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदा काष्टी रोडवरील न्यू लोकसेवा हॉटेल समोर स्विफ्ट क्रमांक MH:४२, BB ३१९८ या गाडीच्या चालकाने हयगईने गाडी चालवून समोरून मोटरसायकलवर येणार्‍या मच्छिंद्र काळे यांच्या मोटर सायकल क्रमांक MH:१६ BP ५९३७ ला जोराची धडक दिल्याने अपघात झाला.

अबब! शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ , आज इतक्या रुग्णांची नोंद

या अपघातात मच्छिंद्र काळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत संजय मोहन काळे, आढळगाव यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर दिली.यानंतर स्विफ्टच्या अज्ञात चालकावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भांदवी ३०४(अ), मोटर वाहन नियम २७९, १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हा पोलीस हवालदार झुंजार बाप्पू यांनी दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भैलुमे करीत आहेत. (Accident in Shrigonda taluka, one killed on the spot, case filed against unknown driver)

Related Posts
1 of 2,047
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: