भीषण अपघात: चारचाकी झाडावर धडकली; तिघांचा जागीच मृत्यू

0 221
Accident: Four-wheeler hits tree; All three died on the spot
 
जळगाव –   भरधाव वेगात जाणारी चारचाकी समोरून येणाऱ्या गुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात निंबाच्या झाडावर आदळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्हयातील भडगाव तालुक्यातील पळासखेडा जवळ घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पळासखेडा येथून चारचाकीने किसन राठोड, पवन राठोड, जितेंद्र पवार हे तिघेही तरवाडे गावाकडे भरधाव वेगात जाताना रस्त्यावर समोरून येणाऱ्या गुरांना वाचवण्याचा प्रयत्नात असताना वाहनाच्या वेगाचा अंदाज न आल्याने सदर वाहन हे रोडच्या बाजूस असलेले लिंबाच्या झाडावर आदळले. या अपघातात गाडीमधील किसन लखीचंद जाधव (वय-४०) रा. गाळण ता. पाचोरा, पवन इंदल राठोड (वय-२६) रा. गाळण ह. मु. टिटवाळा ता. कल्याण, जितेंद्र काशिनाथ पवार रा. ठाकुर्ली ता. कल्याण जि. ठाणे तिघांना डोक्याला आणि हातापायाला जबर मार लागला. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय भडगाव येथे दाखल केले असता तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Related Posts
1 of 2,427
दरम्यान, वाहनाची धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात कार संपूर्ण चक्काचूर झाली होती. तसेच एअर बॅग सुद्धा फुटल्या होत्या. या बाबत सुनील वसंतराव राठोड रा. गाळण ता. पाचोरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर हे करत आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: