भिंगार येथील खूनाचे गुन्ह्यातील फरार आरोपी मुंबई येथून जेरबंद

0 29

अहमदनगर – भिंगार परिसरातील मोमीन गल्ली मध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांड मधील आरोपीला आखेर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत जेरबंद केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि  दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ७. ०० वा. सुमारास जावेद शेख, रा. मोमीन गल्ली, भिंगार याने रमेश उर्फ रमाकांत खबरचंद काळे, वय- ३५ वर्षे, रा. ब्रम्हतळे, आलमगीर, भिंगार यांस तूला मेलेली बकरी देतो असे सांगून मोमीन गल्लीचे जवळ असलेल्या काटवनामध्ये नेवून त्यास, आमच्या बकऱ्या चोरतोस असे म्हणून जावेद शेख व त्याचे सोबत असलेल्या तीन अनोळखी साथीदारांनी मारहाण करुन जावेद शेख याने रमेश उर्फ रमाकांत काळे यास सोबत आणलेल्या बाटलीमधील काहीतरी विषारी औषध पाजले होते.

त्यानंतर रमेश उर्फ रमाकांत काळे हा सिटी केअर हॉस्पिटल, अहमदनगर येथे उपचार घेत असताना दुसऱ्या दिवशी मयत झाला होता. सदर घटनेमध्ये तपासांती फिर्यादी श्री. भैय्यासाहेब अशोकराव देशमूख, पोसई, भिंगार कॅम्प पो. स्टे. यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. I २८७४/२०२०, भादवि कलम ३०२, ३२८, ३२३, ३४ प्रमाणे जावेद शेख व त्याचे साथीदाराविरुध्द दि. २०/१२/२०२० रोजी दाखल
करण्यात आला होता.

मनपा सभापती निवडणुकीसाठी शहरात राजकीय घडामोडीला वेग

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हयातील मुख्य आरोपी जावेद शेख हा फरार झाला होता. सदर फरार आरोपीचा शोध घेणेकामी पोनि/अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी मा. पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले होते. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार हे फरार आरोपी जावेद शेख याचा कसून शोध घेत असताना पोनि/श्री. अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, आरोपी जावेद शेख हा राबोडी परिसर, टाणे येथे नातेवाईकाकडे रहा असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील पोहेकॉ/भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, पोना/ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी, शंकर चौधरी, पोकॉ/संदीप दरंदले, योगेश सातपूते, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून ठाणे येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून आरोपी नामे जावेद रौफ शेख, वय- ४२ वर्षे, रा. घर नं. १७६, मोमीन गल्ली, भिंगार यांस ताब्यात घेवून त्यांस अहमदनगर येथे आणून भिंगार कॅम्प पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे.

Related Posts
1 of 1,291

पूजा तीन वर्ष भाजपाची कार्यकर्ता होती – वडिलांचा गौप्यस्फोट

पुढील कार्यवाही श्री. विशाल ढुमे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, अहमदनगर हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभ कुमार आगरवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. विशाल दुमे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तो पर्यंत एखाद्याला दोषी ठरवणं हे कितपत योग्य ? – अजित पवार  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: