DNA मराठी

Ahmednagar crime :- अल्पवयीन मुलीचे अपहरण

15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले

0 11
Molestation of a minor girl

नगर : मैत्रिणीच्या घरुन पुस्तक घेऊन येते असे म्हणुन घराबाहेर गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन (Abduction of a minor girl) मुलीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. ही घटना शनिवारी १५ रोजी रात्री साडे दहा वाजण्याचे सुमारास नगर कल्याण रोडवर घडली.

या बाबतची माहिती अशी की नगर कल्याण रोडवर राहणारी अल्पवयीन मुलगी घरच्या सर्वजणासह जेवण करुन घराचे छतावर फिरत असताना अचानक तिच्या आईला म्हणाली की मी माझी मैत्रीणीकडुन पुस्तक घेउन येते असे म्हणुन ती छतावरुन खाली आली. ती परत वर आली नाही त्यामुळे घरच्यांनी तिच्या मैत्रीणीच्या घरी जावुन तिच्याबाबत चौकशी केली असता ती तिच्याकडे आली नसल्याचे समजले. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचा शोध आजुबाजुला व इतर नातेवाइकांकडे घेतला असता ती मिळुन आली नाही. म्हणुन त्यांची खात्री झाली की त्यांच्या मुलीचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी काहीतरी आमीष दाखवुन तिला फुस लावुन तिचे अपहरण केले.

महापालिकेच्या इमारतीवरून एकाची उडी…

Related Posts
1 of 2,494

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरूद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 363 अन्वये अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली.
बेपत्ता मुलींचे वर्णन असे आहे — वय १५ वर्षे , उंची ४ ते साडेचार फुट, रंग गोरा, नाक -सरळ, चेहरा- गोल पेहराव चाँकलेची कलरचा टॉप लँगीज काळे रंगाची ओढणी काळे रंगाची पायात चप्पल. असे वर्णन आहे. या वर्णनाची मुलगी कोणाला दिसल्यास अगर तिच्या बाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे फोन नं. 0241 2416117 या फोन वर सम्पर्क करावा असे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: