आपला परीवार संवाद यात्रा ,आम आदमी सर्वसामान्य जनतेच्या हिताची काम करणारा पक्ष

0 13

जामखेड – आम आदमी पक्षाची भूमिका ही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आहे .पक्षाचे कार्यकर्ते हीच पक्षाची मूळे असून त्यामुळेच पक्षाचे झाडे वादळातही भक्कम पुणे उभे आहे .पक्षाचा देशभरात विस्तार करताना राष्ट्र, राज्य मग कार्यकर्ते अशी भूमिका ठेवून पक्ष सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी अशा प्रकारे काम करत आहे हे सांगण्यासाठी ,,”आपला परिवार संवाद यात्रा ” काढली आहे असे प्रतिपादन आम आदमी पार्टी महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी केले .

आम आदमी पार्टीच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या आपला परिवार संवाद यात्रेचे जामखेड शाखेच्या वतीने जामखेड येथे स्वागत करण्यात आले यावेळी कोरोना सर्व नियम पाळून येथील कार्यालयात घेतलेल्या छोट्याखानी कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करताना धनंजय शिंदे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आम आदमी पार्टीची राज्याचे सहसंयोजक किशोर माध्यम होते.

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई

राष्ट्रीय परिषद सदस्य किरण उपकारे, किसन आव्हाड, तिलक डुंगरवाल, प्रा.आशोक डोंगरे, शरद शिंदे, राजेंद्र कर्डिले, राजेंद्र नागवडे, भरत खळाळ, सुचित्रा शेळके, अश्विन शेळके, संपत मोरे, विकास डेंगळे, राहुल रणपिसे, भरत डेंगळे, बोडखे दादा, संतोष नवलाखा, बजरंग सरडे, संदेश घायतडक, संभाजी आव्हाड,सुंदर परदेशी, डॉ.दता भोरे, अजय भोसले , स्वानंद कुलकर्णी, महेश बोरकर, बिपीन वारे, जयपाल वर्मा, समीर मणियार, अतुल खराडे, निजामुद्दीन शेख,शुभम बनकर आदि सह अहमदनगर जिल्हा चे आम आदमी पार्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण – संजय राठोड

Related Posts
1 of 1,292

यावेळी अध्यक्षीय भाषणात राज्याचे सहसंयोजक किशोर मानध्यान म्हणाले की आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जी पक्षाचे बी पेरले होते. त्याचे आता मोठ्या वटवृक्षात रूपांतर होत असून या वटवृक्षाला कुठे पाने कुठे फुले तर कुठे फळे दिसू लागली आहेत. आपला परिवार संवाद  यात्रेला  मोठा प्रतिसाद मिळत असल्याने पक्षाला उज्वल भविष्य आहे. असे मत महाराष्ट्र आम आदमी पार्टीचे सहसंयोजक किशोर मध्यान यांनी व्यक्त केले.

लॉकडाउनचा अल्टिमेटम दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक 

यावेळी किसन आव्हाड, बजरंग सरडे,संतोष नवलाखा, तिलक डुंगरवाल, सुचित्राताई शेळके,शरद शिंदे, प्रा. अशोक डोंगरे, राजेंद्र नागवडे आदि मान्यवरांची भाषणे झाली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड बिपिन वारे केले तर आभार किसन आव्हाड यांनी मानले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: