इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी घरातून गेलेला युवक बेपत्ता

अहमदनगर – इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी गेलेला प्रशांत भागचंद शेळके हा युवक घरी पुन्हा न परतल्याने पाथर्डी पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रशांत भागचंद शेळके हा आई-वडिलांसह कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे राहतो. तो 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी गेला व पुन्हा घरी परतलेला नाही. त्यांचे मोठे बंधू योगेश शेळके शहरातील न्यु आर्टस महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत आहे.