लग्नाची खरेदी करून घरी परत येत असताना भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू

0 382
Accident in Shrigonda taluka, one killed on the spot, case filed against unknown driver

पुणे –  पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर (Pune- solapur national highway) बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये 21 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. प्रतिक्षा सदाशिव कांबळे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. ती आपल्या भावासाबोत लग्नाची खरेदी करून घरी परत जात असताना हा अपघात झाला.(A young woman died on the spot while returning home after shopping for a wedding)

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार प्रतिक्षा हीचा अवघ्या काही दिवसानंतर लग्न होणार होते. त्यासाठी संपुर्ण कुटुंब तयारी करत होता. लग्नाचा काही सामन खरेदी करण्यासाठी ती आपल्या भावासबोत पुणे येथे गेली होती.

सामान खरेदी करुन परत आपल्या घरी येत असताना वरवंड याठिकाणी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अचानक लागलेल्या धडकीमुळे दोघेही बहिण-भाऊ रस्त्यावर फेकले गेले.तर वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने प्रतीक्षाचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा भाऊ शुभम कांबळे हा किरकोळ जखमी झाला आहे.

Related Posts
1 of 2,047

  एकएकटे लढा मग पाहुयात कोणाची ताकद जास्त – चंद्रकांत पाटील

अपघातानंतर भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात प्रतीक्षाचा मृतदेह पडला होता. दरम्यान अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला आहे. रात्री उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.(A young woman died on the spot while returning home after shopping for a wedding)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: