कर्जत मधील नामवंत डॉक्टर यांनी आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह केली आत्महत्या

0 9

अहमदनगर – कर्जत तालुक्यातील राशीन येथील नामवंत डॉक्टर थोरात यांनी पत्नी व दोन मुलांसह आत्महत्या केली आहे. या आत्महत्याने कर्जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे. गळाफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी चिट्ठी लावली होती. त्या चिठ्ठीत डॉक्टरने म्हटले आहे की माझा थोरला मुलगा वय (१८) कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराधासारखे वाटत आहे .

अनेक दिवसापासून आम्ही व्यतीत होतो .कृष्णाचेही कशात मन लागत नाही. हे आम्ही वडील आणि आई म्हणून दुःख सहन करू शकत नाही म्हणून मी व माझी पत्नी वर्षा वय (३९) आत्महत्या सारखे कृत्य करत आहेत. हे योग्य नसेल तरी नाईलाजावास्तव हे कृत्य करीत आहे त्यात कोणालाही जबाबदार धरू नये.

Related Posts
1 of 1,291

मात्र पोलिस या प्रकरणात आता ही आत्महत्या आहे की घातपात ? याचा कसून तपास करत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: