क्षुल्लक वादावरून रेस्टॉरंटमध्ये वेटरची गोळी झाडून हत्या …

0 253

नवी दिल्ली –   देशाची राजधानी दिल्ली येथे दररोज काहींना काही गुन्ह्याची नोंद होतच असते कधी मुलीवर बलात्कार तर कधी क्षुल्लक कारणावरून हत्या.  परत एकदा राजधानी दिल्ली येथे अशीच एक घटना घडली असून या घटनेत क्षुल्लक कारणावरून रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) वेटरची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. पार्सल नेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी वाद झाल्यानंतर वेटरवर गोळीबार केल्याने या गोळीबारात 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे .(A waiter was shot dead in a restaurant over a trivial dispute …)

या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी कि दिल्लीतील छावला भागातील खैरा रोडवरील हेव्हन एन रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला. सोमवारी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास पोलिसांना यासंबंधी फोन आला होता. विकास यादवच्या मालकीच्या या रेस्टॉरंटमध्ये महेश नावाचा 19 वर्षीय तरुण वेटरचं काम करत होता. 23 ऑगस्टला तो एका दिवसाच्या सुट्टीवर होता. त्यामुळे यादव यांनी 18 वर्षीय अमन उर्फ गुलाम साबिर याला कामावर बोलावलं होतं. सव्वा सातच्या सुमारास दोघे बाईकस्वार रेस्टॉरंटला आले चिली पोटॅटो आणि मोमोजची ऑर्डर दिली. ऑर्डरसाठी ते काऊंटरजवळ थांबले असताना अमनही तिथेच होता. तिघांची आपसात काहीतरी वादावादी झाली. त्यानंतर दोघांपैकी एकाने अमनला गोळी मारली आणि दोघं पसार झाले.

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

Related Posts
1 of 1,603

उपस्थित लोकांनी अमनला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. हत्येचं नेमकं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपींचा शोध सुरु केला आहे.(A waiter was shot dead in a restaurant over a trivial dispute …)

धक्कादायक! नशेचं इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार , आरोपी फरार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: