बेलवंडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; लाखो रुपयांचा ऐवज व रोकड लंपास…

श्रीगोंदा : – श्रीगोंदा तालुक्यातील बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाचे असणाऱ्या बेलवंडी गावात बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील बस स्थानक परिसरात अज्ञात चोरट्यांनी रात्री ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास सुमारे सहा किराणा दुकान, व चार ठिकाणी घरफोडी करून चोऱ्या करून १ लाख ८८ हजार रुपयांच्या रोख रकमेसह २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात एकनाथ शेलार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या बाबत दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बेलवंडी पोलीस ठाण्याच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या बसस्थानक परिसरातील श्रीस्वामी समर्थ मेडिकल , ओमसाई किराणा, व ओम साई हार्डवेअर, सावतामाळी किराणा, स्वरा मेडीकल, जगदंबापान स्टॉल तसेच सुखदेव माहाडीक , तुकाराम घोडेकर , कल्यान पंडीत, गिरीश गायकवाड यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत १ लाख ८८ हजार रुपयांच्या रोख रकमेसह एकूण २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात एकनाथ शेलार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलवंडी पोलिसांतर्फे जनतेला आवाहन करण्यात येते की बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील नागरिकांनी आपल्या गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा आणि ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करावे .जेणेकरून चोरीच्या घटनाना वेळीच लगाम बसेल.सर्व व्यापारी दुकानदार यांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेणे, त्याचबरोबर आपल्या गावात कोणी संशयित व्यक्ती, आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथके रवाना केली असल्याची माहिती नंदकुमार दुधाळ यांनी दिली.
त्याचबरोबर बेलवंडी सारख्या मोठ्या गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा आणि ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित नसणे ही फार मोठी खंत असल्याचे मत नंदकुमार दुधाळ यांनी व्यक्त केले.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत पासून जवळच एकाच रात्री सहा दुकाने आणि चार घरांमध्ये सुरू होऊन सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याने संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर जमा होऊन सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले यावर पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी एक पोलिस कर्मचारी कायमस्वरूपी गस्त घालणाऱ असल्याचे सांगत चोरीचा तपास लवकर लाऊन आरोपींना ताब्यात घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र सुरूच असून मागील काही दिवसांपूर्वी गावातीलच झगडे यांच्या बांधकामावरील स्टील चोरी गेले होते. त्या प्रकरणाचा तपास अद्याप लागत नाही तोच बेलवंडी परिसरात केलेल्या चोऱ्यांमुळे पोलिसांचे गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याची परिसरात चर्चा असून चोरांचा वेळीच बंदोबस्त करावा व या भागात गस्त वाढवावी व चोरी प्रकरणातील आरोपींना शोधून अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ व व्यापारी वर्गातून होत आहे.
व्यापारी वर्गाच्या पाठीशी बेलवंडी गाव खंबीरपणे पणे उभे राहील आणि पोलीस ठाणे गावात असताना अशा एकाच दिवशी 6 दुकाने आणि 4 घरफोडी होत असेल तर पोलिसांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही,पोलीस यंत्रणा कमी पडत आहे.पोलिसांनी नुसत्या केसेस दाखल करून चालणार नाही तर आरोपी देखील पकडले पाहिजे.भविष्य काळात अशा घटना होऊ नयेत यासाठी वेळीच बंदीबस्त करावा.
आठ दिवसांत आरोपी नाही पकडले तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा अण्णासाहेब शेलार,यांनी दिला.