DNA मराठी

Soldier came to help :- आरडाओरडत झाला सैनिक मदतीला धाऊन आला

घरावरती उन्हाने पत्रे गरम न होण्यासाठी त्यावरती उसाचे पाचरट टाकले होते, परंतु त्या ठिकाणावरून एक विद्युत वायर गेलेली असल्यामुळे ती शॉर्टसर्किट झाल्यामुळे पत्र्यावरती असणारे पाचरट पेटले.

0 39
Soldier came to help dna news marathi
श्रीगोंदा प्रतिनीधी :- श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील मोहन बाजीराव ढवळे पाटील यांच्या घरावरती आग लागल्याची घटना शुक्रवार दिनांक ३१ मार्च रोजी दुपारी चार च्या सुमारास घडली आसता सगळीकडे आरडाओरडत झाला त्या घराच्या काही अंतरावर व सुट्टीवर असणाऱ्या भारतीय सैन्य दलातील सैनिक शरद मनोहर बोरगे यांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेत व काही सहकाऱ्यांच्या मदतीने घरावर चढून आग विझवण्याचे काम केले.
       सविस्तर वृत्त आसे कि ढवळगाव येथील मोहन ढवळे पाटील यांच्या घरावरती उन्हाने पत्रे गरम न होण्यासाठी त्यावरती उसाचे पाचरट टाकले होते, परंतु त्या ठिकाणावरून एक विद्युत वायर गेलेली असल्यामुळे ती शॉर्टसर्किट झाल्यामुळे पत्र्यावरती असणारे पाचरट पेटले व क्षणाचा विलंब न करता भारतीय सैन्य दलातील सुट्टीवर असणारे सैनिक शरद मनोहर बोरगे यांनी घरावर चढत आग विझवली. सुदैवाने कोणतीही हानी व नुकसान झाले नाही.
Related Posts
1 of 2,499
    यावेळी मोहन ढवळे,राहुल बोरगे,पवन बोरगे,राजु मंडाळे,अनिकेत ढवळे,रोहीत सावंत,हर्षद गायकवाड,कोंडीभाऊ कर्हे,प्रतिक शिंदे,शुभम  लोंढे,अमोल बोरगे,प्रविण ढवळे, वायरमन इत्यादी तरुणांनी सहकार्य केले
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: