प्रांताधिकाऱ्य़ांवर हल्ला करून पोलीस कर्मचारीने पळविला वाळूचा डम्पर

0 398

अहमदनगर –   अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत (Karjat) मध्ये  वाळूचा डम्पर (dumper) पकडल्याचा राग आल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रांताधिकाऱ्य़ांना धक्काबुक्की करत शिवीगाळ करून वाळूचा डम्पर पळवून नेल्याची घटना घडली आहे.  या प्रकरणात कामगार तलाठी दीपक मुन्नालाल बिरुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव व्हरकटे (पोलीस कर्मचारी ) याच्यासह डम्परचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . (A sand dumper was snatched by a police officer after attacking the governor)

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार कर्जत चे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, मंडळाधिकारी बाळासाहेब सुद्रिक, तलाठी दीपक बिरुटे, धुळाजी केसकर आणि रवी लोखंडे हे पथक वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी कर्जत-मिरजगाव रस्त्यावरील बालाजी मंदिराच्या शेजारी गेले होते. बालाजीनगर परिसरात घालमे यांचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका डम्परमधून तीन ब्रास वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे पथकाला दिसून आले.

हे पण पहा – बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला..

Related Posts
1 of 1,481

त्यांनी डम्परचालकाला थांबविले असता, कर्जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असणारा केशव व्हरकटे तेथे आला. ‘मी पोलीस कर्मचारी असून, माझा डम्पर सोडा’ अशी दमदाटी त्याने डॉ. थोरबोले यांच्यासह पथकाला केली. पथकाने या डम्परचे व्हिडीओ चित्रीकरण सुरू केले असता, व्हरकटे याने प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांना धक्काबुक्की करून ढकलून दिले. त्यानंतर चालकाला डम्पर पळवून नेण्यास सांगितले. चालकाने तीन ब्रास वाळू असलेला डम्पर पळवून नेला. यादरम्यान व्हरकटे हा देखील फरार झाला आहे.

याप्रकरणी कामगार तलाठी बिरुटे यांच्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याच्यासह डम्परचालकावर कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याची सर्व माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना कळविण्यात आली आहे. (A sand dumper was snatched by a police officer after attacking the governor)

Jobs सरकारी बँकेत भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: